Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • मनोरंजन
  • “10 कोटी दे नाहीतर…”, एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी, कोण आहे धमकी देणारा मास्टरमाइंड?
Top News

“10 कोटी दे नाहीतर…”, एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी, कोण आहे धमकी देणारा मास्टरमाइंड?

Elvish Yadav | ‘बिग बॉस ओटीटी 2’ चा विजेता आणि सोशल मीडिया स्टार एल्विश यादव (Elvish Yadav) सध्या चांगलाच चर्चेत आला आहे. एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी (Death Threat) देण्यात आली आहे. सोबतच 10 कोटी रूपयांची खंडणीची मागणी देखील करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या एल्विश यादव हा चर्चेत आला असून त्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – डोळ्यांत आनंदाश्रू… थलपती विजय CM होताच त्रिशा झाली भावुक? व्हिडीओ तुफान व्हायरल

एल्विश यादवला नेमकी कोणी दिली धमकी?

एल्विश यादवला आणि त्याच्या वडिलांना एका परदेशी नंबरवरून फोन आला होता आणि त्यांना या नंबरवरून तब्बल 10 कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आली आहे. सोबत जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली आहे. एल्विशला एक धमकीचा मेसेज देखील आला आहे. दोन दिवसांमध्ये 10 कोटी रूपये दे नाहीतर जीव मारू, अशी धमकी त्याला देण्यात आली आहे. धमकीचा हा मेसेज मिळाल्यानंतर एल्विशने हरियाणातील गुरूग्राम येथील पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तर या प्रकरणी पोलिसांनी तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Elvish Yadavv (@elvish_yadav)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एल्विश यादवला एका परदेशी नंबरवरून व्हॉट्सअॅप कॉल आला होता. तो कॉल एल्विशने उचलला नाही, त्यानंतर त्याला व्हॉट्सअॅपवर एक मेसेज आला. या मेसेजमध्ये त्याला 10 कोटी रूपयांची खंडणी मागण्यात आली आहे. तसेच एल्विशने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याला मेसेज करणाऱ्याने स्वत:ची ओळख लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य रणदीप मलिक असल्याची करून दिली. तसेच एल्विश सोबत त्याच्या वडिलांना देखील मेसेज करण्यात आला होता. ज्यामध्ये दोन दिवसांमध्ये पैसे द्या नाहीतर गोळ्या घालून ठार करू, अशी धमकी देण्यात आली आहे.

एल्विशला धमकी मिळाल्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. तसेच त्याच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तर सध्या पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून आरोपींचा शोध घेत आहेत.

 

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts