• Home
  • ताज्या बातम्या
  • बॉम्ब बनवण्यासाठी यूट्यूबवरून घेतले प्रशिक्षण; हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन, पुणे हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मोठा खुलासा!
Pune

बॉम्ब बनवण्यासाठी यूट्यूबवरून घेतले प्रशिक्षण; हॉस्पिटलला लुटण्याचा होता प्लॅन, पुणे हडपसर बॉम्ब प्रकरणाचा मोठा खुलासा!

Pune Hadapsar Bomb Case

Pune Hadapsar Bomb Case: पुण्यातील हडपसरमधील एका हॉस्पिटलमध्ये बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली असून त्यामागील धक्कादायक कारणाचा पुणे पोलिसांनी खुलासा केला आहे.

पुण्यातील हडपसर परिसरातील एका खासगी रुग्णालयात बॉम्बसदृश (Bomb) वस्तू सापडल्याने निर्माण झालेल्या खळबळीप्रकरणी पोलिसांनी महत्वाचा खुलासा केला आहे. या प्रकरणातील मुख्य संशयिताला महाराष्ट्र एटीएसने नागपूर रेल्वे स्थानकावरून ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासात धक्कदायक माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने यूट्यूबवरील व्हिडीओ (Youtube Video) पाहून बॉम्बसदृश वस्तू तयार केली होती. आर्थिक अडचणीत असल्याने रुग्णालयाकडून खंडणी उकळण्याचा त्याचा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.

हेही वाचा: मोठी बातमी! राज्यात सरकारी कांदा खरेदीला सुरुवात, CM फडणवीस यांनी जाहीर केले नवे दर

या कारवाईबाबत माहिती देताना पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले की, आरोपी रेल्वेने नागपूरच्या दिशेने पळाल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएस आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. नागपूर रेल्वे स्थानकावर सापळा रचून त्याला ताब्यात घेण्यात आले.

प्राथमिक तपासानुसार या प्रकरणाला कोणताही दहशतवादी अँगल नसल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. आरोपीनेहे कृत्य एकट्याने केल्याची शक्यता असून त्याचा पूर्वी कोणताही गुन्हेगारी इतिहास नसल्याची माहिती समोर आली आहे.

वैयक्तिक उपचारांसाठी

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी काही दिवसांपूर्वी वैयक्तिक उपचारांसाठी संबंधित रुग्णालयात गेला होता. मात्र उपचारासाठी पैसे नसल्याने त्याने रुग्णालयाला धमकी देऊन पैसे उकळण्याचा कट रचल्याचा संशय आहे.

बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त

तपासादरम्यान आरोपीच्या घरातून डिजिटल घड्याळ, वायर, पाइप आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांनी सांगितले की, तयार करण्यात आलेल्या वस्तूमध्ये कोणतेही स्फोटक पदार्थ आढळले नाहीत. अवघ्या काहीशे रुपयांत ही बॉम्बसदृश वस्तू तयार करण्यात आल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून फॉरेन्सिक अहवालानंतर आणखी माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts