Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात? शेळकेंना मंत्रीपदाची लॉटरी?
Top News

आदिती तटकरेंचं मंत्रीपद धोक्यात? शेळकेंना मंत्रीपदाची लॉटरी?

Aditi Tatkare Minister Post

Aditi Tatkare Minister Post : राजकारणात (Maharashtra Politics) कधी काय होईल, याचा नेम नाही. सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत आतल्या आत काहीतरी भलतंच शिजतंय, अशा वावड्या उठायला लागल्यात. निमित्त ठरलंय निवडणूक (Election Commission) आयोगाला दिलेलं एक पत्र आणि त्यातली गायब झालेली नावं. पण, या सगळ्या धुरळ्यात आता रोहित पवारांनी थेट बॉम्बच टाकलाय. रोहित पवार गेल्या काही दिवसांपासून करत असलेल्या वक्तव्यांनी राजकारणात “पिक्चर अभी बाकी है” ये तो बस शुरुवात है… असं दिसतंय.. रोहित पवार (Rohit Pawar) यांनी दावा केला आहे कि, आदिती तटकरेंचं (Aaditi Tatkare) मंत्रीपद जाणार आणि मावळचे आमदार सुनील शेळकेंची (Sunil Shelake) लॉटरी लागणार. आता या दाव्यात किती हवा आहे आणि किती तथ्य? काय आहे हे मंत्रिपदाचं गणित? खरंच आदिती तटकरे यांना मंत्रिपद जाणार का ? आणि कुणाची वर्णी लागणार हे येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा – तटकरेंना मोठा धक्का? भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार..

सगळ्यात आधी मॅटर काय आहे ते समजून घ्या. केन्द्रीय निवडणूक आयोगाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची म्हणजेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाची नवीन राष्ट्रीय कार्यकारिणीची यादी २९ एप्रिलला सादर करण्यात आली होती. त्यावर सही होती पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांची. पण या यादीत पक्षाचे दोन सर्वात मोठे आणि अनुभवी चेहरे प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची नावे गायब होती. बस… इथूनच संशयाची ठिणगी पडली. राष्ट्रवादीतून याचं खंडन झालं असलं, तरी विरोधकांच्या हातात आयत कोलीत मिळालं.

रोहित पवारांचा थेट तटकरे कुटुंबावर निशाणा

आता याच मुद्द्यावरून शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांनी थेट तटकरे कुटुंबावर निशाणा साधलाय. जर यादीतून सुनील तटकरेंचं नाव कापलं गेलं असेल, तर पक्षातलं त्यांचं स्थान धोक्यात आहे. तटकरे कुटुंबाचं महत्त्व कमी करण्यासाठी त्यांची कन्या आणि सध्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचं मंत्रीपद काढून घेतलं जाऊ शकतं! आणि त्यांच्या जागी आमदार सुनील शेळके यांना थेट मंत्रिपदाची लॉटरी लागू शकते. रोहित पवारांच्या मते, पुढच्या काही महिन्यांत महायुतीच्या सरकारमध्ये मोठे फेरबदल होणार असून, सध्या राज्यमंत्री असणाऱ्यांना कॅबिनेट बढती दिली जाऊ शकते.

बावनकुळेंनी सस्पेन्स आणखी वाढवला

रोहित पवारांनी हा दावा केल्यावर भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्रकारांनी घेरलं. त्यावर बावनकुळेंनी जे उत्तर दिलं, त्याने तर सस्पेन्स आणखी वाढवला. बावनकुळे म्हणाले, ‘मंत्रिपद बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आहे. आणि राष्ट्रवादीत कोणाला मंत्रिपद द्यायचं, हा निर्णय घेण्याचा अधिकार सुनेत्रा पवारांना आहे. असं भाजपच्या चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. याचाच अर्थ महायुतीत मंत्रिपद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशाने मंत्रीपद बदललं जाऊ शकतं. त्यामुळे राष्ट्रवादीने जरी मंत्रिपद बदलण्याचा विचार केला असला तरी अंतिम निर्णय हा भाजपच्याच हातात म्हणजे देवा भाऊ जे म्हणतील तेच होईल असं थोडक्यात म्हणता येईल.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts