• Home
  • ताज्या बातम्या
  • “कॉकरोच जनता पार्टी” नेमकी कुणी सुरू केली? सोशल मीडियावर उपहासात्मक चळवळीची चर्चा
ताज्या बातम्या

“कॉकरोच जनता पार्टी” नेमकी कुणी सुरू केली? सोशल मीडियावर उपहासात्मक चळवळीची चर्चा

Cockroach Janata Party

Cockroach Janata Party: सध्या सोशल मीडियावर कॉकरोच जनता पार्टीची जोरदार चर्चा आहे. चला तर जाणून घेऊयात नेमकं कोणी सुरुवात केली आहे.

सुप्रीम कोर्टाशी संबंधित एका विधानानंतर देशभरात सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. या विधानावर विविध प्रतिक्रिया उमटत असताना एक उपहासात्मक (satirical) चळवळही चर्चेत आली आहे, ज्याचे नाव “कॉकरोच जनता पार्टी” आहे. आता तुम्ही विचार करत असाल ही पार्टी कोणी सुरू केली आहे, चला तर जाणून घेऊया याबाबत अधिक सविस्तर माहिती.

सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी बेरोजगार तरुणांबाबत केलेल्या एका टिप्पणीमुळे नवा वाद निर्माण झाल्याचे बोलले जात आहे. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर संताप, टीका आणि उपहास अशा मिश्र प्रतिक्रिया दिसत आहेत.

उपहासात्मक चळवळीची सुरुवात

या पार्श्वभूमीवर अभिजित दिपके नावाच्या तरुणाने “कॉकरोच जनता पार्टी” नावाची एक प्रतीकात्मक आणि उपहासात्मक चळवळ सुरू केली आहे. ही कोणतीही अधिकृत राजकीय पार्टी नसून सामाजिक-राजकीय परिस्थितीवर विनोदी पद्धतीने भाष्य करणारा उपक्रम आहे.

सोशल संदेश देण्याचा प्रयत्न

या संकल्पनेत “उत्साही पण बेरोजगार, आळशी आणि सतत ऑनलाइन असणारे तरुण” यांना प्रतीकात्मक सदस्य म्हणून दाखवले जात आहे. यामागे बेरोजगारी आणि तरुणांच्या परिस्थितीवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते.

सोशल मीडियावर जोरदार प्रतिसाद

ही कल्पना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून अनेक युजर्स त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. काहींनी याला उपहासात्मक अभिव्यक्ती म्हटले आहे, तर काहींनी त्यामागील सामाजिक संदेशावर चर्चा सुरू केली आहे.

अभिजित दिपके कोण आहेत?

अभिजित दिपके हे छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असून सध्या ते अमेरिकेतील बोस्टन विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण घेतले असून यापूर्वी आम आदमी पक्षासाठीही काम केले आहे.

भारतात परतण्याची शक्यता

अभिजित लवकरच भारतात परतणार असल्याची माहिती असून त्यांच्या या उपहासात्मक चळवळीमुळे सुरू झालेली चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरूच आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts