Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • यंदा 3 की 4 जुलै कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी
धार्मिक

यंदा 3 की 4 जुलै कधी आहे संकष्टी चतुर्थी? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

Sankashti Chaturthi 2026

Sankashti Chaturthi 2026: जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येणारी कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी यंदा विशेष मानली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया शुभ मुहूर्त, पूजाविधी आणि नियम काय आहेत.

जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात येणारी कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी यंदा विशेष मानली जात आहे. यंदा संकष्टीच्या तिथीबाबत अनेक भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. संकष्टी ३ जुलैला आहे की ४ जुलैला? कोणत्या दिवशी व्रत करावे, चंद्रोदयाची वेळ काय आहे, कोणता शुभ योग जुळून येत आहे आणि कोणत्या राशींना लाभ होऊ शकतो, याबाबत जाणून घेऊयात संपूर्ण माहिती.

हेही वाचा: यंदा जुलै 2026 मध्ये येत आहेत दोन पवित्र एकादशी; जाणून घ्या तिथी आणि पूजेची वेळ

संकष्टी चतुर्थी नेमकी कधी आहे?

पंचांगानुसार, जेष्ठ कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी ३ जुलै रोजी सकाळी ११ वाजून ३० मिनिटांनी सुरू होईल आणि ४ जुलै रोजी दुपारी १२ वाजून ३९ मिनिटांपर्यंत समाप्त होईल. त्यामुळे संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रोदयाच्या आधारे पाळले जाते. त्यामुळे यंदा ३ जुलै २०२६, शुक्रवार रोजी संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाणार आहे.

चंद्रोदयाची वेळ

संकष्टी चतुर्थीचे व्रत चंद्रदर्शनानंतरच पूर्ण केले जाते. यंदा ३ जुलै रोजी रात्री 9:52 वाजता चंद्रोदय होण्याची शक्यता आहे. त्यानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रताचे पारण करावे.

यंदा विशेष का आहे ही संकष्टी?

यंदाची कृष्णपिंगल संकष्टी चतुर्थी धार्मिकदृष्ट्या महत्वाची मानली जाते. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग जुळून येत असून, सकाळी 5:28 ते 11:46 या वेळेत हा शुभ योग राहील. या काळात भगवान गणेशाची पूजा केल्यास शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.
याशिवाय त्या दिवशी विष्कंभ योग, त्यानंतर प्रीती योग, तसेच श्रवण आणि नंतर धनिष्ठा नक्षत्र यांचा संयोगही राहणार आहे.

पूजेसाठी शुभ मुहूर्त

ब्रह्म मुहूर्त: पहाटे 4:07 ते 4:47
लाभ मुहूर्त: सकाळी 7:12 ते 8:56
अमृत मुहूर्त: सकाळी 8:56 ते 10:41
अभिजित मुहूर्त: सकाळी 11:57 ते दुपारी 12:53

या राशींना लाभ मिळू शकतो

धार्मिक श्रद्धा आणि ज्योतिषीय मान्यतेनुसार, या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वृषभ, मिथुन, सिंह, वृश्चिक आणि मकर राशीच्या व्यक्तींना आर्थिक, व्यावसायिक आणि कौटुंबिक क्षेत्रात सकारात्मक घडामोडी अनुभवायला मिळू शकतात.

संकष्टी चतुर्थीला काय करावे?

भगवान गणेशाला दुर्वा, लाल फुले आणि मोदक अर्पण करा.
“ॐ गं गणपतये नमः” या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा.
चंद्रदर्शनानंतर चंद्राला अर्घ्य अर्पण करून व्रताचे पारण करा.
गरजूंना अन्नदान किंवा दानधर्म केल्यास शुभ फल मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे.

टीप: व्रत, पूजा आणि तिथीबाबत स्थानिक पंचांग किंवा आपल्या परिसरातील पुरोहितांचा सल्ला घेणे योग्य ठरेल.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts