Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू; प्रकाश आंबेडकर उच्च न्यायालयात देणार आव्हान?
Top News

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 लागू; प्रकाश आंबेडकर उच्च न्यायालयात देणार आव्हान?

Prakash Ambedkar

Prakash Ambedkar : महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा आजपासून लागू झाला आहे, यामुळे लग्न, सामाजिक दबाव, वैयक्तिक स्वातंत्र्य, वारसाहक्क आणि संगोपन यांच्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात, मात्र या कायद्याला अनेक स्थरांतून विरोध होतोय, वंचितचे प्रकाश आंबेडकर हे या कायद्याला आव्हान देणार आहेत, मात्र काय आहे हा कायदा ? याला विरोध का होतोय ? काय आहेत यातील नव्या तरतुदी ? आणि खरंच या कायद्याला कायदेशीर आव्हान देता येईल का ?

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 म्हणजे काय? ( Freedom of Religion Act )

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ हा राज्यात बेकायदेशीर आणि सक्तीच्या धर्मांतराला आळा घालण्यासाठी लागू करण्यात आलेला कडक कायदा आहे. राज्य सरकारने मार्च २०२६ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात हे विधेयक विधानसभा आणि विधानपरिषद या दोन्ही सभागृहात मंजूर करून घेतले होते. त्यानंतर राज्यपाल जिष्णू देव वर्मा आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, राज्य शासनाने ३० जुलै २०२६ रोजी अधिकृत Official Gazette नुसार याची अधिसूचना प्रसिद्ध केली. त्यामुळे ऑगस्ट २०२६ च्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा संपूर्ण महाराष्ट्र राज्यात लागू झाला आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश बळजबरी, आमिष, फसवणूक, चुकीची माहिती किंवा विवाहाचे खोटे आश्वासन देऊन केले जाणारे धर्मांतर रोखणे हा असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे…..

या नव्या कायद्यामध्ये धर्मांतराच्या प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि गुन्हेगारांना कडक शिक्षा करण्यासाठी सविस्तर कायदेशीर तरतुदी करण्यात आल्या आहेत. कायद्यानुसार, कोणत्याही व्यक्तीला पैशांचे आमिष दाखवून, मोफत शिक्षणाची सोय करून, चांगल्या जीवनशैलीचे प्रलोभन देऊन, दैवी चमत्कारांचा दावा करून धर्म बदलण्यास प्रवृत्त करणे हा गंभीर फौजदारी गुन्हा मानला जाईल. तसेच शैक्षणिक संस्थांमधून मुलांचे वैचारिक मतपरिवर्तन करून किंवा मोठ्या प्रमाणावर सामूहिक धर्मांतर घडवून आणण्यावर या कायद्यान्वये पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या कायद्यांतर्गत नोंदवले जाणारे सर्व गुन्हे हे दखलपात्र आणि अजामीनपात्र असतील, म्हणजेच संशयित आरोपीला पोलीस तात्काळ अटक करू शकतात आणि त्याला सहजासहजी जामीन मिळणार नाही.

हेही वाचा : मोठी बातमी! राष्ट्रवादी अजित पवार गट, शिंदे

धर्मांतराबाबत काय आहेत नवीन नियम?

शिक्षेचा विचार केला तर सामान्य गुन्ह्यांसाठी तीन ते पाच वर्षांच्या कारावासाची आणि एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. परंतु, जर पीडित व्यक्ती अल्पवयीन असेल, महिला असेल किंवा ती SC किंवा ST समाजाची असेल, तर गुन्हेगाराला सात वर्षांपर्यंतचा कठोर कारावास होऊ शकतो. पुन्हा पुन्हा असा गुन्हा घडत असेल, तर त्यांच्यासाठी ही शिक्षा १० वर्षांपर्यंत वाढवण्याची तरतूद कायद्यात करण्यात आलीये. सामूहिक धर्मांतराच्या प्रकरणातही सात वर्षांची जेल केली जाईल.

या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा नियम म्हणजे धर्मांतरापूर्वी द्यावी लागणारी पूर्वसूचना. स्वताच्या इच्छेने धर्म बदलायचा असेल तर त्या व्यक्तीला धर्मांतराच्या ६० दिवस आधी जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे लेखी अर्ज सादर करावा लागेल. धर्मांतर झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत पुन्हा एकदा जिल्हा दंडाधिकार्‍यांकडे त्याची नोंदणी करावी लागेल. जर एखाद्या व्यक्तीने बेकायदेशीर धर्मांतर करून लग्न केलं तर ते लग्न न्यायालय रद्द ठरवू शकते.

तक्रार दाखल करण्याच्या प्रक्रियेतही मोठा बदल करण्यात आला आहे. फक्त पीडित व्यक्तीच नाही, तर तिचे आई-वडील, भाऊ-बहीण आणि रक्ताचे नातेवाईकही पोलीस ठाण्यात जाऊन या कायद्यानुसार FIR नोंदवू शकतात. या कायद्यातील सर्वात महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा म्हणजे पुराव्याची जबाबदारी उलटवण्यात आलीये… सामान्य कायद्यात गुन्हा सिद्ध करण्याची जबाबदारी पोलिसांची किंवा फिर्यादीची असते, मात्र या कायद्यानुसार धर्मांतर सक्तीने किंवा फसवणुकीने झालेले नाही हे सिद्ध करण्याची संपूर्ण कायदेशीर जबाबदारी स्वतः आरोपीवर आणि धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर असणार आहे.

वैयक्तिक स्वातंत्र्य आणि धार्मिक अधिकारांवर प्रश्न

महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा २०२६ लागू झाल्यानंतर राज्यातील सामाजिक संस्था, अल्पसंख्याक संघटना, मानवाधिकार कार्यकर्ते आणि विरोधी पक्षांकडून याला विरोध होत आहे. आक्षेप असा घेतला जातोय कि, हा कायदा नागरिकांच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर गदा आणतो. स्वताच्या इच्छेने धर्म बदलणाऱ्या व्यक्तीला ६० दिवस आधी प्रशासनाला कळवावे लागणे, म्हणजे नागरिकांच्या खाजगी आयुष्यात आणि त्यांच्या धार्मिक श्रद्धेत शासनाचा अनावश्यक हस्तक्षेप आहे. यामुळे जिल्हा दंडाधिकारी कार्यालयाकडून किंवा स्थानिक पोलिसांकडून नागरिकांचा छळ होण्याची आणि त्यांच्यावर सामाजिक दबाव आणला जाण्याची शक्यता निर्माण होईल, असा तर्क विरोधकांकडून मांडला जातोय.

दुसरा मोठा विरोध लग्नाच्या स्वातंत्र्याशी संबंधित आहे. दोन व्यक्ती आपल्या पसंतीने लग्न करत असताना, त्यांचे लग्न धर्मांतराच्या मुद्द्यावरून न्यायालय रद्द करू शकते, ही तरतूद वैयक्तिक निवडीच्या स्वातंत्र्याचा गळा घोटणारी आहे. तसेच, नातेवाईकांना तक्रार करण्याचा अधिकार दिल्यामुळे आंतरधर्मीय विवाह करणाऱ्या जोडप्यांच्या कौटुंबिक आणि खाजगी जीवनात नातेवाईक किंवा विशिष्ट विचारसरणीच्या संघटनांकडून पोलिसी बळाचा वापर करून त्रास दिला जाऊ शकतो, अशी भीती व्यक्त केली जातेय. पुराव्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्याच्या तरतुदीलाही कायदेशीर तज्ज्ञांनी विरोध केलाय, कारण यामुळे कोणत्याही निष्पाप व्यक्तीला खोट्या आरोपाखाली अडकवून स्वतःला निर्दोष सिद्ध करणे कठीण होईल. हा कायदा धार्मिक सलोखा निर्माण करण्याऐवजी समाजात संशयाचे आणि भीतीचे वातावरण तयार करेल आणि याचा वापर राजकीय फायद्यासाठी काही समुदायांना लक्ष्य करण्यासाठी केला जाऊ शकतो.

हेही वाचा : “कधीकधी वाटतं राजकारणातून निवृत्त व्हावं, पण…”; पंकजा

प्रकाश आंबेडकर कायदेशीर आव्हान का देणार? ( Prakash Ambedkar )

Freedom of Religion Act : यावर आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर ( Prakash Ambedkar ) यांनी या कायद्याला मुंबई उच्च न्यायालयात कायदेशीर आव्हान देण्याची रणनीती आखलीये. त्यांचं आव्हान Basic Structure of Constitution ला आधारित आहे. भारतीय संविधानाचे कलम २५ प्रत्येक नागरिकाला आपल्या निवडीनुसार कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे, त्याचे आचरण करण्याचे आणि त्याचा शांततापूर्ण प्रसार करण्याचे मूलभूत स्वातंत्र्य देते. प्रकाश आंबेडकर यांचा असा युक्तिवाद आहे की, राज्य सरकार कडक अटी आणि नोटीस देण्याची सक्ती करून नागरिकांच्या या घटनात्मक हक्कावर मर्यादा घालू शकत नाही.

दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कलम २१ अंतर्गत मिळणारा जीविताचा आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा अधिकार, ज्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने गोपनीयतेचा अधिकार आणि स्वतःच्या पसंतीने जीवनसाथी निवडण्याचा अधिकार आहे. प्रकाश आंबेडकर यांच्याम्हण्यानुसार, लग्नासाठी स्वताच्या मानाने होणाऱ्या धर्मांतरावर प्रशासकीय देखरेख असणे आणि नागरिकांच्या आंतरधर्मीय लग्नाची पात्रता ठरवण्याचा अधिकार राज्याला देणे हे वैयक्तिक स्वातंत्र्याचे हनन आहे. पुराव्याची जबाबदारी आरोपीवर टाकण्याच्या तरतुदीला ते फौजदारी न्यायशास्त्राच्या ‘आरोपीला जोपर्यंत गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत निर्दोष मानले जावे’ या मूलभूत तत्त्वाच्या विरोधातील मानतात आणि हाच मुद्दा ते न्यायालयात प्रभावीपणे मांडणार आहेत.त्याचप्रमाणे इतर राज्यांमध्ये जसे की गुजरात, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या कायद्यांमधील काही वादग्रस्त कलमांना उच्च न्यायालयांनी आणि सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी स्थगिती दिली आहे, आणि गंभीर निरीक्षण नोंदवली आहेत. प्रकाश आंबेडकर या Judicial Precedents चा आधार घेऊन महाराष्ट्राच्या कायद्यातील तरतुदी कशा प्रकारे असंवैधानिक आहेत, हे मुंबई उच्च न्यायालयासमोर सिद्ध करण्याचा प्रयत्न करणार आहेत. या कायदेशीर लढाईमुळे महाराष्ट्रातील हा नवा कायदा घटनात्मक निकषांवर टिकतो की नाही, याचा अंतिम निर्णय आता पुढे कळेलच….

FAQ

प्र1. महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य कायदा 2026 कधी लागू झाला? ( Religion Conversion Law Maharashtra )
उत्तर: ऑगस्ट 2026 च्या पहिल्या आठवड्यापासून हा कायदा महाराष्ट्रात लागू झाला.

प्र2. या कायद्याचा मुख्य उद्देश काय आहे?
उत्तर: सक्ती, फसवणूक, आमिष किंवा विवाहाच्या नावाखाली होणारे बेकायदेशीर धर्मांतर रोखणे हा या कायद्याचा उद्देश आहे.

प्र3. धर्मांतरासाठी कोणती प्रक्रिया अनिवार्य आहे?
उत्तर: धर्मांतर करण्यापूर्वी 60 दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांना लेखी सूचना द्यावी लागते आणि धर्मांतरानंतर 21 दिवसांत नोंद करावी लागते.

प्र4. प्रकाश आंबेडकर या कायद्याला विरोध का करत आहेत? ( Prakash Ambedkar )
उत्तर: हा कायदा संविधानातील धार्मिक स्वातंत्र्य आणि वैयक्तिक स्वातंत्र्याच्या अधिकारांचे उल्लंघन करतो, असा त्यांचा दावा आहे.

प्र5. या कायद्याला न्यायालयात आव्हान देता येऊ शकते का? ( Mumbai High Court )
उत्तर: होय. संविधानाच्या तरतुदींच्या आधारे मुंबई उच्च न्यायालयात या कायद्याला आव्हान दिले जाऊ शकते.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts