• Home
  • फूड
  • छोट्या बिया, मोठे फायदे! रोजच्या आहारात समावेश करा या 3 सुपरफूड्सचा
लाईफस्टाईल

छोट्या बिया, मोठे फायदे! रोजच्या आहारात समावेश करा या 3 सुपरफूड्सचा

Superfood Seeds

Superfood Seeds: आरोग्य टिकवण्यासाठी महागड्या सप्लिमेंट्सपेक्षा नैसर्गिक आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करणे अधिक फायदेशीर ठरू शकते. आकाराने छोट्या असलेल्या काही बियांमध्ये प्रथिने, फायबर, जीवनसत्वे आणि खनिजे भरपूर प्रमाणात असतात. जाणून घ्या रोजच्या आहारात समाविष्ट करता येणाऱ्या ५ आरोग्यदायी बियांचे फायदे.

आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत आरोग्यकडे लक्ष देणे खूप महत्वाचे झाले आहे. शरीराला योग्य ऊर्जा आणि आवश्यक पोषण मिळण्यासाठी संतुलित आहार घेणे गरजेचे आहे. अशावेळी आहारात काही छोट्या पण पौष्टिक पदार्थांचा समावेश केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

हेही वाचा: ही आहे अनोखी बँक! आपल्या कर्मचाऱ्यांच्या आरोग्यासाठी करते हजारो कोटींचा खर्च

बिया हा त्यापैकीच एक उत्तम पर्याय आहे. आकाराने लहान असलेल्या या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात पोषक घटक आढळतात. प्रथिने, फायबर, चांगले फॅट्स, जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स यांसारखे घटक शरीरासाठी उपयुक्त ठरतात. त्यामुळे अनेक बियांना ‘सुपरफूड’ म्हणून ओळखले जाते.

या बियांचा वापर दही, सॅलड, ओट्स, स्मूदी किंवा नाश्त्यात सहज करता येतो. मात्र, योग्य प्रमाणात सेवन करणे महत्त्वाचे आहे. जाणून घेऊया रोजच्या आहारात समाविष्ट करता येणाऱ्या काही आरोग्यदायी बियांबद्दल.

चिया सिड

चिया सिड फायबर, ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रथिने, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्सचा चांगला स्रोत मानल्या जातात. यामुळे पचनक्रिया सुधारण्यास, बराच वेळ पोट भरल्यासारखे वाटण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण मिळण्यास मदत होऊ शकते. चिया सिड खाण्यापूर्वी त्या पाण्यात भिजवून घेणे फायदेशीर ठरते. त्यानंतर त्या दही, स्मूदी किंवा ओट्समध्ये मिसळून खाऊ शकता.

अळशीच्या बिया

अळशीच्या बियांमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड, फायबर आणि लिग्नॅन्ससारखे घटक असतात. या बियांचा संतुलित आहारात समावेश केल्याने हृदयाचे आरोग्य आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत होऊ शकते. अळशी हलकी भाजून त्याची पूड करून दही, सॅलड किंवा पोळीच्या पिठात मिसळून खाता येते.

भोपळ्याच्या बिया

भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम, झिंक, लोह, प्रथिने आणि आरोग्यदायी फॅट्स आढळतात. या बिया शरीराला ऊर्जा देण्यास आणि स्नायू व हाडांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. भोपळ्याच्या बिया भाजून नाश्त्यामध्ये किंवा सॅलडसोबत खाता येतात.

सूर्यफुलाच्या बिया

सूर्यफुलाच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ई, सेलेनियम, फायबर आणि हेल्दी फॅट्स असतात. हे घटक शरीरातील पेशींचे संरक्षण करण्यास आणि त्वचेच्या आरोग्यासाठी मदत करू शकतात. या बिया ओट्स, सॅलड किंवा स्नॅक्समध्ये मिसळून खाऊ शकता.

तीळ

तिळामध्ये कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, प्रथिने आणि चांगले फॅट्स भरपूर प्रमाणात असतात. हाडांच्या मजबुतीसाठी आणि शरीराला ऊर्जा मिळण्यासाठी तीळ उपयुक्त ठरू शकतात. तिळाचा वापर चटणी, लाडू, सॅलड किंवा विविध पदार्थांमध्ये केला जाऊ शकतो.

बिया खाताना या गोष्टी लक्षात ठेवा

वेगवेगळ्या प्रकारच्या बियांचा आहारात समावेश केल्यास शरीराला विविध पोषक घटक मिळू शकतात. मात्र, कोणत्याही पदार्थाचे अतिसेवन टाळणे गरजेचे आहे.

पहिल्यांदा बिया खाण्यास सुरुवात करताना कमी प्रमाणात सेवन करा. काही लोकांना विशिष्ट बियांपासून अॅलर्जी होऊ शकते, त्यामुळे त्रास जाणवल्यास तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

फायबरयुक्त बिया खाताना पुरेसे पाणी पिणेही आवश्यक आहे. बिया हा संतुलित आहाराचा एक भाग असावा; केवळ त्यांच्यावर अवलंबून राहणे योग्य नाही.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts