Manoj Jarange Patil: मराठा आरक्षण आणि कुणबी प्रमाणपत्रांच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) पुन्हा आक्रमक झाले आहेत. माढ्यातील सभेत त्यांनी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप करत सरकारला थेट इशारा दिला. नेमकं काय घडलं आणि जरांगे पाटलांचा संताप का झाला? जाणून घेऊया.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)) पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत. पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असलेल्या जरांगे पाटलांनी माढा येथील सभेत महायुती सरकारमधील नेत्यांवर जोरदार निशाणा साधला. कुणबी प्रमाणपत्रे रद्द होत असल्याचा आरोप करत त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis) , उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Bawankule) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. (Manoj Jarange Patil Warns Shinde-Bawankule Over Kunbi Certificates)
हेही वाचा: ग्रहांची मोठी उलथापालथ! सूर्य-केतूच्या युतीने ‘या’ राशींचं टेन्शन वाढणार; करिअर-पैशांबाबत सावध राहा
जरांगेचे कोणती मागणी आहे?
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र (Maratha Reservation) मिळावे, या मागणीसाठी झालेल्या आंदोलनानंतर सरकारने शिंदे समितीची स्थापना केली होती. कुणबी नोंदी आढळलेल्या नागरिकांना प्रमाणपत्रे देण्यात आली. मात्र, आता जात पडताळणी समित्यांकडून काही प्रमाणपत्रे अवैध ठरवली जात असल्याचा दावा जरांगे पाटलांनी केला आहे. सरकारनेच प्रमाणपत्रे द्यायची आणि नंतर ती रद्द करायची, हा मराठा समाजाचा जाणीवपूर्वक छळ असल्याचा आरोप त्यांनी केला. (LS Marathi News Channel)
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही थेट टीका
माढ्यातील सभेत जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांच्यावरही थेट टीका केली. सातारा आणि औंध गॅझेटियरमधील नोंदींचा मुद्दा उपस्थित करत मराठा समाजाला आरक्षणापासून दूर ठेवण्याचा कट असल्याचा आरोप त्यांनी केला. बावनकुळे यांच्या माध्यमातून मराठा समाजावर अन्याय होत असल्याचा दावाही त्यांनी केला. मात्र, बावनकुळे यांनी जरांगेंचे आरोप फेटाळून लावले आहेत.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही इशारा
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाही जरांगे पाटलांनी इशारा दिला. त्यांच्या मंत्र्यांनी मराठा समाजाविरोधातील निर्णय किंवा भूमिका थांबवावी, अन्यथा मराठा समाज शिंदेंपासून दूर जाऊ शकतो, असा दावा त्यांनी केला.
कुणबी प्रमाणपत्र
दरम्यान, 29 ऑगस्टच्या आंदोलनानंतर पुन्हा कुणबी प्रमाणपत्रे रद्द (Maratha Kunbi Certificate) करण्याचे धाडस कोणी करणार नाही, असा इशाराही जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) दिला आहे. त्यामुळे आगामी काळात मराठा आरक्षणाचा मुद्दा आणि महायुती सरकारमधील नेत्यांवरील त्यांची आक्रमक भूमिका अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.









