Chhatrapati Sambhajinagar Crime News: छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगरावर एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ‘आता काहीच सोल्यूशन नाही’ म्हणत १९ वर्षीय मुलाने टोकाचं पाऊल उचललं. पण या घटनेमागचं नेमकं कारण काय होतं?
आता काहीच सोल्यूशन नाही…’ हे १९ वर्षीय कुणालचे (Kunal Khavdya Dongar) शेवटचे शब्द ठरले. काही वेळातच छत्रपती संभाजीनगरच्या खवड्या डोंगरावर (Khavdya Dongar tragedy) अशी घटना घडली, ज्याने संपूर्ण परिसर हादरला. मुलाला वाचवण्यासाठी आई-वडील डोंगरावर पोहोचले, तब्बल तीन तास त्याची समजूत काढली; मात्र अखेर एका क्षणात सगळं संपलं. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात आई-वडिलांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमागे नेमकं कारण काय? कुणालने टोकाचं पाऊल का उचललं? आणि आई-वडिलांचा जीव कसा गेला? जाणून घेऊया या काळजाचा ठोका चुकवणाऱ्या घटनेमागची संपूर्ण कहाणी. (Maharashtra tragic incident)
हेही वाचा: रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठीचा ‘रुल’; राज्यभर धडक तपासणी, १,२६८ जणांना नोटिसा
नेमकं काय घडलं? (Khavdya mountain accident)
ही घटना शुक्रवारी, २१ ऑगस्ट रोजी वाळूज MIDC परिसरातील तिसगावजवळच्या खवड्या डोंगरावर घडली. प्राथमिक माहितीनुसार, कुणालचा आई-वडिलांसोबत मोबाईल खरेदीवरून वाद झाला होता. कुणालला आयफोन १५ हवा होता. या मागणीवरून झालेल्या वादानंतर तो घरातून निघून डोंगरावर गेला.
सकाळी साधारण १० वाजता कुणाल डोंगरावर पोहोचला. तो टोकाचं पाऊल उचलण्याच्या मनस्थितीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्याचे वडील मुरलीधर चांदगुडे आणि आई संगीता चांदगुडे त्याला समजावण्यासाठी डोंगरावर पोहोचले.
तीन तास सुरू होते समजावण्याचे प्रयत्न
कुणाल डोंगराच्या उंच कड्यावर उभा होता. त्याला खाली आणण्यासाठी आई-वडिलांसह स्थानिक ग्रामस्थ आणि पोलिसांनीही प्रयत्न सुरू केले. परिस्थिती गंभीर असल्याने अग्निशमन दलालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले.
तब्बल तीन तास कुणालची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याला जीवन संपवू नये, असे वारंवार सांगण्यात येत होते. त्याला वाचवण्यासाठी बचाव पथकानेही प्रयत्न केले. मात्र कुणाल कोणाचंही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता.
‘तुला आयफोन १५ प्रो देतो…’
कुणालला शांत करण्यासाठी तिसगावचे सरपंच आणि ग्रामस्थांनीही त्याच्याशी संवाद साधला. सरपंचांनी त्याला, ‘तुला आयफोन १५ प्रो देतो’, (iphone 15 Pro) असं सांगून खाली येण्याची विनंती केल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra breaking news)
मात्र कुणालने हताशपणे ‘आता काहीच सोल्यूशन नाही’ असं म्हटलं. त्यानंतर त्याची आईही त्याला समजावत होती. ‘दुसरं सोल्यूशन नाही, असं का वाटतं तुला?’ असा सवाल आईने केल्याचं सांगितलं जात आहे.
एका क्षणात सगळं संपलं (Khavdya Dongar family death)
कुणालला वाचवण्यासाठी त्याचे वडील त्याच्या जवळ गेले. त्याला पकडण्याचा प्रयत्न करत असताना दोघांचाही तोल गेला आणि ते डोंगरावरून खाली कोसळले.
मुलगा आणि पती खाली पडल्याचं पाहून संगीता यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर त्या देखील डोंगरावरून खाली पडल्या. या दुर्घटनेत कुणाल, मुरलीधर आणि संगीता या तिघांचाही मृत्यू झाला.
आयफोनच्या वादातून शोकांतिका?
या घटनेमागे आयफोन खरेदीवरून झालेला वाद असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र केवळ मोबाईल खरेदीचा मुद्दा की त्यामागे आणखी काही कारण होतं, याचा तपास पोलीस करत आहेत.
एका कुटुंबातील तिघांचा अशाप्रकारे दुर्दैवी अंत झाल्याने तिसगाव आणि परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची संपूर्ण पार्श्वभूमी आणि नेमकी कारणे तपासानंतरच स्पष्ट होणार आहेत.








