Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • रिलीजआधीच यशच्या ‘टॉक्सिक’ ची हवा! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कमाई, ‘या’ चित्रपटालाही टाकलं मागे?
मनोरंजन

रिलीजआधीच यशच्या ‘टॉक्सिक’ ची हवा! अॅडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कमाई, ‘या’ चित्रपटालाही टाकलं मागे?

Toxic Advance Booking
Toxic Advance Booking: साऊथ सुपरस्टार यशच्या ‘टॉक्सिक : अ फेरी टेल फॉर ग्रोन-अप्स’ या सिनेमाची रिलीजपूर्वीच जोरदार चर्चा सुरू झाली आहे. अॅडव्हान्स बुकिंगला मिळणार प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे.

‘टॉक्सिक’च्या अॅडव्हान्स (Toxic Advance Booking) बुकिंगला २१ ऑगस्टपासून सुरुवात झाली. अवघ्या काही दिवसांतच सिनेमासाठी मोठ्या प्रमाणावर तिकीट विक्री झाल्याचं आकडेवारीतून समोर आलं आहे.

पहिल्या दिवसाच्या शोसाठी आतापर्यंत ५ लेखांतून अधिक तिकिटांची विक्री झाल्याचं सांगितलं जात आहे. या बुकिंगमधूनचित्रपटाने सुमारे २१.५ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केल्याची माहिती आहे. ब्लॉक आणि होल्ड करण्यात आलेल्या सीट्सचा समावेश केल्यास हा आकडा आणखी वाढून 30 कोटी रुपयांच्या पुढे गेल्याचं वृत्त आहे.

हेही वाचा: पुण्यातील पोलिस ठाण्यात जुळलं प्रेम! दोन महिला पोलिसांचा ‘या’ तारखेला विवाह; सुट्टीच्या अर्जात काय लिहिलं?

कर्नाटकात सर्वाधिक क्रेझ

यशचा मोठा चाहतावर्ग कर्नाटकात आहे आणि त्याचा परिणाम ‘टॉक्सिक’च्या बुकिंगवरही (Toxic Box Office) स्पष्टपणे दिसत आहे.

कर्नाटकातून सिनेमाला सर्वाधिक प्रतिसाद मिळत असून, बेंगळुरूसह म्हैसूर, शिवमोग्गा आणि रायचूर या शहरांमध्येही तिकिटांची मोठी मागणी असल्याचं समोर आलं आहे. यशच्या होम स्टेटमध्ये चित्रपटाने अॅडव्हान्स बुकिंगमधूनच मोठा टप्पा गाठला आहे. ( LS Marathi News Channel )

सहा भाषांमध्ये होणार रिलीज

‘टॉक्सिक’ची (Toxic box office collection) पोहोच केवळ कन्नड प्रेक्षकांपुरती मर्यादित राहणार नाही. हा सिनेमा कन्नड, हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि इंग्रजी अशा सहा भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

त्यामुळे देशभरातील यशच्या चाहत्यांमध्ये सिनेमाबाबत उत्सुकता वाढली आहे.

‘धुरंधर’शीही रंगली तुलना

अॅडव्हान्स बुकिंगच्या आकडेवारीमुळे ‘टॉक्सिक’ची तुलना रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’शीही केली जात आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ब्लॉक आणि होल्ड सीट्ससह ‘टॉक्सिक’ने सुमारे 30.14 कोटी रुपयांचा बुकिंग आकडा गाठला आहे.

आता या रिलीजपूर्व प्रतिसादाचं रूपांतर बॉक्स ऑफिसवरील कमाईत किती होतं, याकडे सिनेप्रेमींचं लक्ष लागलं आहे. यशचा ‘टॉक्सिक’ पहिल्याच दिवशी किती मोठा विक्रम करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts