Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • काळ्या रंगाचा हाय स्लिट गाऊन, हातात बंदूक; नयनताराचा Toxic किलर अवतार
मनोरंजन

काळ्या रंगाचा हाय स्लिट गाऊन, हातात बंदूक; नयनताराचा Toxic किलर अवतार

Nayanthara holding a gun in black high slit gown

Nayanthara killer look in toxic : दाक्षिणात्य सुपरस्टार यशच्या आगामी चित्रपटातून अभिनेत्री नयनतारा गंगाच्या भूमिकेत असल्याची माहिती समोर आली आहे. अभिनेता यश चा आगामी चित्रपट Toxic : A fairytale for grown ups या चित्रपटात दोघे एकत्र दिसणार आहे. या चित्रपटाचे आज पोस्टर रिलीज करण्यात आले. या पोस्टरमध्ये नयनतारा बोल्ड लूक मध्ये दिसून आली.

Toxic : A fairytale for grown ups या चित्रपटात नयनतारा मुख्य भूमिका साकारणार आहे. या चित्रपटा ती गंगा हि भूमिका साकारणार असून तिचा पहिला लूक आज पोस्टरच्या माध्यमातून रिलीज करण्यात आला. या पोस्टरमध्ये नयनताराच्या हातात बंदूक दिसत असून ती अप्रतिम अशा कॅसिनोच्या प्रवेशदारात उभी असल्याचे दिसत आहे. या पोस्टर मध्ये तिची भूमिका हि प्रभावी, निर्भय, धाडसी महिलेसारखी दिसत आहे. तिने काळ्या रंगाचा हाय स्लिट गाऊन परिधान केला असून डोळ्यात अंगार दिसून येत आहे. तिचा हा किलर लूक पाहून चाहते चित्रपट प्रदर्शित होण्याची वाट बघत आहे.

अभिनेता यशचे पुनरागमन

टॉक्सिक या चित्रपटाचे दिग्दर्शक गीता मोहनदास हे आहे. या चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत यश असणार आहे. हा चित्रपट 19 मार्च 2026 रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. अभिनेता यश KGF chapter 2 या चित्रपटानंतर Toxic : A fairytale for grown ups या चित्रपटातुन पुनरागमन करणार आहे.

नयनताराचा वेगळाच पैलू पाहायला मिळणार

या चित्रपटात नयनतारा नवीन अवतारात दिसणार असून तिचा हा नवीन लूक आणि नवीन भूमिका प्रेक्षकांनी कधीही पहिली नसेल. तिच्या कास्टिंग बद्दल दिग्दर्शक गीता मोहनदास यांनी सांगितले कि, नयनतारा दोन दशकांपेक्षा अधिक काळ काम केलेली अनुभवी, प्रभावी अभिनेत्री आहे. तिचा टॉक्सिक मध्ये एक वेगळाच पैलू पाहायला मिळेल. हा चित्रपट कन्नड आणि इंग्रजी भाषेत तयार होत असून इतर भारतीय भाषांमध्ये डब करण्यात येणार आहे.

हे ही वाचा : विजय रश्मिका फेब्रुवारीत बांधणार लग्नगाठ; उदयपूरमध्ये होणार विवाह

या तारखेला होणार प्रदर्शित

या चित्रपटाचे लेखन यश आणि गीता मोहनदास यांनी केले आहे. तर चित्रपटाची निर्मिती केव्हीएन प्रॉडक्शन आणि मॉन्स्टर माईंड क्रिएशन आणि वेंकट के नारायण करत आहे. या चित्रपटाच्या छायांकनाची जबाबदारी ही राजीव रवी, संगीत रवी बसू संपादन उज्वल कुलकर्णी यांनी केले आहे. हा चित्रपट गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर 19 मार्च 2026 रोजी प्रदर्शित होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts