• Home
  • ताज्या बातम्या
  • मराठा समाजासाठी मोठी अपडेट! जिल्हाधिकाऱ्यांचा थेट आदेश; प्रमाणपत्रासाठी खास व्यवस्था
राजकारण

मराठा समाजासाठी मोठी अपडेट! जिल्हाधिकाऱ्यांचा थेट आदेश; प्रमाणपत्रासाठी खास व्यवस्था

Maratha Kunbi Certificate
4
Maratha Kunbi Certificate: मराठा समाजासाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मराठा-कुणबी प्रमाणपत्र मिळवताना नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष व्यवस्था केली आहे

मराठा – कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत नागरिकांना येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी जालना जिल्हा प्रशासनाने महत्वाचे पाऊल उचलले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मराठा-कुणबी, कुणबी- मराठा आणि कुणबी जात प्रमाणपत्रासंदर्भात मार्गदर्शक करण्यासाठी स्वतंत्र हेल्पलाइन कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे प्रमाणपत्रासाठी आवश्यक कागदपत्रे, अर्जाची प्रक्रिया आणि उपलब्ध पुराव्यांबाबत नागरिकांना थेट प्रशासनाकडून माहिती मिळणार आहे.

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील या निर्णयाकडे विशेष महत्वाने पाहिले जात आहे. अंतरवली सराटी येथे होणाऱ्या आंदोलनासाठी तयारीला वेग आला असून, जरांगे पाटील आपल्या आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम आहेत. सरकारकडून ठोस निर्णय न झाल्यास आंदोलन सुरू करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

हेही वाचा: UPI MDR वर फिनटेक कंपन्यांचा सरकारकडे आग्रह; ‘आमचा हिस्सा कायद्याने ठरवा’

याच पार्श्वभूमीवर जालना जिल्हाधिकाऱ्यांनी मराठा -कुणबी प्रमाणपत्राच्या प्रक्रियेसाठी हेल्पलाइन कक्ष उपलब्ध करून दिला आहे. शासनाच्या निर्देशांनुसार हा कक्ष सुरू करण्यात आला असून, कार्यालयीन वेळेत नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी नागरिकांना आवश्यक ते मार्गदर्शन करणार आहेत.

प्रमाणपत्रासाठी कुठे आणि कसा मिळणार मदत?

मराठा समाजातील नागरिकांना मराठा-कुणबी, कुणबी-मराठा तसेच कुणबी जातीचे प्रमाणपत्र मिळवताना अनेकदा कागदपत्रे आणि जुन्या अभिलेखांबाबत अडचणी येतात. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने हेल्पलाइन कक्षाच्या माध्यमातून नागरिकांना आवश्यक माहिती देण्याची व्यवस्था केली आहे.

प्रमाणपत्र किंवा जात पडताळणी प्रमाणपत्रासंदर्भात काही अडचण असल्यास नागरिकांनी ०२४८२-२२३१३२ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी प्रमाणपत्रासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे आणि उपलब्ध पुरावे सोबत घेऊन हेल्पलाइन कक्षाशी संपर्क साधावा, असेही प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. Maharashtra Caste Certificate

दोन अधिकाऱ्यांवर जबाबदारी

जालना जिल्हाधिकारी कार्यालयात सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाइन कक्षासाठी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार (गृह) परमेश्वर शिंदे आणि महसूल सहाय्यक संदीप इंगळे यांचा समावेश आहे.

नागरिकांना जात प्रमाणपत्रासाठी कोणते पुरावे आवश्यक आहेत, अर्ज कसा भरायचा आणि प्रक्रियेतील पुढील टप्पे कोणते आहेत, याबाबत हे अधिकारी मार्गदर्शन करणार आहेत.

तसेच उपलब्ध शासकीय अभिलेखांमध्ये आवश्यक नोंदी शोधण्यासाठी नागरिकांना मदत करणे आणि अर्ज प्रक्रियेदरम्यान येणाऱ्या अडचणींचे निराकरण करण्याचे कामही या कक्षामार्फत केले जाणार आहे.

मराठा आरक्षणावर सरकारची भूमिका काय? Maratha Kunbi Latest News

दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार सकारात्मक असल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला आहे. मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत आणि इतर मंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन या विषयावर चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले.

मराठा समाजाला मिळणारे आरक्षण न्यायालयात टिकणारे असावे आणि इतर कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का लागू नये, अशी सरकारची भूमिका असल्याचे शिवेंद्रराजे भोसले यांनी स्पष्ट केले.

आरक्षणाच्या मुद्द्यावर योग्य तो मार्ग काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असून, संबंधित समितीच्या माध्यमातूनही चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

एकीकडे मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाची तयारी सुरू असताना दुसरीकडे जालना जिल्हा प्रशासनाने प्रमाणपत्र प्रक्रियेसाठी हेल्पलाइन कक्ष सुरू केल्याने या निर्णयाकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts