Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • ‘एकच वादा, अजित दादा’नंतर आता ‘आपल्या वहिनी आहेत ना!’; सुनेत्रा पवारांच्या रिलाँचिंगची तयारी?
राजकारण

‘एकच वादा, अजित दादा’नंतर आता ‘आपल्या वहिनी आहेत ना!’; सुनेत्रा पवारांच्या रिलाँचिंगची तयारी?

Sunetra Pawar
5
Sunetra Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नव्या राजकीय भूमिकेची चर्चा रंगली आहे. 27 सप्टेंबरच्या नाशिक अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या राज्यव्यापी जनसंपर्क मोहिमेची आणि ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ या टॅगलाईनची चर्चा सुरू झाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना अधिक आक्रमकपणे पक्षाच्या चेहऱ्याच्या भूमिकेत पुढे आणण्याची तयारी सुरू असल्याची चर्चा आहे. २७ सप्टेंबर रोजी नाशिकमध्ये होणाऱ्या पक्षाच्या राज्यव्यापी शिबिराच्या पार्श्वभूमीवर या हालचालींना वेग आला आहे. पक्षाच्या माहितीनुसार या शिबिरात राज्यभरातील प्रमुख नेते, जिल्हाध्यक्ष आणि पदाधिकारी सहभागी होणार आहेत.

हेही वाचा: धक्कादायक! तिच्यावर 9 जणांकडून 3 दिवस अत्याचार; 10 शिकणाऱ्या मुलीसोबत काय घडलं?

‘आपल्या वहिनी आहेत ना!’ नवी टॅगलाईन चर्चेत

सुनेत्रा पवार यांच्या जनसंपर्कासाठी ‘आपल्या वहिनी आहेत ना!’ ही टॅगलाईन वापरण्याची रणनीती आखली जात असल्याचे विविध वृत्तांत समोर आले आहेत. यापूर्वी अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या प्रचारात ‘एकच वादा, अजित दादा’ ही घोषणा मोठ्या प्रमाणात वापरली जात होती. आता बदललेल्या राजकीय परिस्थितीत सुनेत्रा पवार यांच्याभोवती पक्षाची नवी प्रतिमा उभी करण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले जात आहे.

राज्यभर दौऱ्यांचीही तयारी?

नाशिकच्या शिबिरानंतर सुनेत्रा पवार यांचे महाराष्ट्रातील विविध भागांत दौरे आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहिती समोर आली आहे. विशेषतः महिला वर्गाशी संपर्क वाढवण्यावर भर दिला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, या मोहिमेचा अंतिम आराखडा आणि अधिकृत घोषणा पक्षाकडून स्पष्ट होणे बाकी आहे.

प्रशांत किशोर यांच्या रणनीतीची चर्चा

सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या राजकीय ब्रँडिंगसाठी प्रशांत किशोर यांच्या रणनीतीचा आधार घेतला जात असल्याचे काही वृत्तांत नमूद करतात. त्यानुसार नव्या टॅगलाईनसोबत जनसंपर्क, पक्ष संघटन आणि राज्यव्यापी दौऱ्यांवर भर देण्याची शक्यता आहे. मात्र, या रणनीतीबाबत पक्षाकडून अधिकृतपणे सर्व तपशील जाहीर झालेला नाही.

दरम्यान, नाशिकमधील 27 सप्टेंबरचे शिबिर हे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीचे पहिले राज्यव्यापी शिबिर ठरणार आहे. त्यामुळे या बैठकीत पक्षाची पुढील दिशा, संघटनात्मक कार्यक्रम आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची भूमिका याबाबत कोणते निर्णय होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts