Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पहिला निकाल सुनेत्रा पवारांच्या बाजूने; ९२ मतांसह सोरटे विजयी
राजकारण

सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पहिला निकाल सुनेत्रा पवारांच्या बाजूने; ९२ मतांसह सोरटे विजयी

Someshwar Sugar Factory Election
Someshwar Sugar Factory Election: बारामतीतील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनेलने विजयी सुरुवात केली आहे. ब वर्ग गटातून संग्राम सोरटे यांनी ९२ मते मिळवत विजय मिळवला असून, या निकालामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

सोमेश्वर सरकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत (Someshwar Sugar Factory Election) सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या समर्थकांनी विजयाचे खाते उघडले आहे. ब वर्ग गटातून संग्राम सोरटे यांनी विजय मिळवत आपल्या गटाला पहिलं यश मिळवून दिलं. अजित पवार यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत सुनेत्रा पवार यांच्या पॅनलची कामगिरी कशी राहणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले होते.

सोमेश्वर साखर कारखान्याच्या २१ संचालक पदांसाठी मतदान पार पडल्यानंतर मतमोजणीला सुरुवात झाली. सुरुवातीच्या निकालात संग्राम सोरटे यांनी बाजी मारली. त्यांना एकूण १३१ मतांपैकी ९२ मते ( Sangram Sorte Election Result ) मिळाली. या निकालामुळे सुनेत्रा पवार यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: लावणीच्या ठेक्यावर थिरकणारी पावलं कायमची थांबली! ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचं वयाच्या ७३व्या वर्षी निधन

पहिल्या निकालाने पॅनलला बळ

बारामतीच्या सहकार क्षेत्रात सोमेश्वर साखर कारखान्याला (Someshwar Election News) विशेष महत्व आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे केवळ कारखान्यापुरते मर्यादित न राहता राज्यातील राजकीय घडामोडींच्या दृष्टीनेही पाहिले जात आहे. अजित पवार यांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाची ही महत्त्वाची परीक्षा मानली जात आहे.

संग्राम सोरटे यांच्या विजयामुळे पॅनलला (Baramati Politics) सुरुवातीलाच यश मिळाले असले, तरी संपूर्ण निवडणुकीचे चित्र स्पष्ट होण्यासाठी उर्वरित जागांचे निकाल महत्वाचे ठरणार आहेत.

पार्थ पवारांचा सर्व जागा जिंकण्याचा दावा

निवडणूक प्रचारादरम्यान खासदार पार्थ पवार यांनी २१ पैकी २१ जागांवर विजय मिळवण्याचा निर्धार व्यक्त केला होता. त्यांनी विविध मतदान केंद्रांना भेट देत कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. सुनेत्रा पवार यांनीही आपल्या पॅनलच्या विजयाबाबत आधीच विश्वास व्यक्त केला होता. आता उर्वरित जागांवर कोण बाजी मारणार आणि अंतिम निकालात कोणत्या गटाचे पारडे जड राहणार, याची उत्सुकता वाढली आहे.

पुरुषोत्तम जगताप यांच्या पॅनलचेही आव्हान

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत (Sugar Factory Election Maharashtra)तिरंगी लढत रंगली. विद्यमान अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी संजय जगताप यांच्या मदतीने स्वतंत्र पॅनल उभे केले होते. त्यामुळे या निवडणुकीत विविध गटांमध्ये चुरस पाहायला मिळाली.

सुरुवातीच्या निकालाने सुनेत्रा पवार यांच्या गटाला दिलासा मिळाला आहे. मात्र, कारखान्याच्या संचालक मंडळावर नेमके कोणाचे वर्चस्व राहणार, हे सर्व निकाल जाहीर झाल्यानंतरच स्पष्ट होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts