Breaking News :
  • Home
  • Top News
  • गडचिरोलीत आश्रमशाळेवर काळाचा घाला! सर्पदंशाच्या संशयातून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं?
गुन्हा

गडचिरोलीत आश्रमशाळेवर काळाचा घाला! सर्पदंशाच्या संशयातून 3 विद्यार्थिनींचा मृत्यू; मध्यरात्री नेमकं काय घडलं?

Gadchiroli
Gadchiroli: गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेत धक्कादायक घटना घडली आहे. सर्पदंशाच्या संशयातून तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. जपतलाई येथील अनुदानित आश्रमशाळेतील तीन विद्यार्थिनींचा सर्पदंशाच्या संशयातून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी, पालक आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

हेही वाचा: कुणबी प्रमाणपत्रांवरून जरांगे पुन्हा आक्रमक; बावनकुळे-शिंदेंना थेट इशारा, नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. सर्पदंशाची लक्षणे जाणवल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन विद्यार्थिनींचा धानोरा येथे, तर एका विद्यार्थिनीचा गडचिरोली येथे मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मृत विद्यार्थिनींपैकी दोन विद्यार्थिनी एटापल्ली तालुक्यातील, तर एक विद्यार्थिनी धानोरा तालुक्यातील असल्याचे समजते. या घटनेनंतर आश्रमशाळेतील इतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे.

दरम्यान, काही विद्यार्थिनींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती आहे. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. ही आश्रमशाळा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली अंतर्गत येते. त्यामुळे या घटनेची प्रशासनाकडून गंभीर दखल घेतली जाण्याची शक्यता आहे.

सर्पदंशाची नेमकी घटना कशी घडली, विद्यार्थिनींना सर्पदंश झाला होता का, तसेच आश्रमशाळेच्या परिसरात सापांचा वावर आणि सुरक्षेच्या उपाययोजना याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळाल्यानंतरच घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून, विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पालकांमध्येही चिंता निर्माण झाली आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts