Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • ओ रोमिओ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; व्हॅलेंटाईन दिनाच्या मुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला
मनोरंजन

ओ रोमिओ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; व्हॅलेंटाईन दिनाच्या मुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

o romio

O Romeo Film Trailer Release : साजिद नाडियाडवाला निर्मित बहुप्रतीक्षित सिनेमा म्हणजे रोमिओ. या चित्रपटाचा दमदार ट्रेलर आज अधिकृतरित्या रिलीज करण्यात आला आहे. हा चित्रपट 13 फेब्रुवारी 2026 रोजी व्हॅलेंटाईन दिनाच्या औचित्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज झाल्यापासून प्रेक्षकांना चित्रपटाची उत्सुकता लागून आहे.

कसा आहे ट्रेलर

रोमिओया चित्रपटा मुख्य भूमिकेत शाहिद कपूर असणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पुन्हा एकदा शाहिद कपूर ऍक्शन, थ्रिलर अवतारात दिसणार आहे. तर मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत तृप्ती डिमरी असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलर मध्ये प्रेम, सूड, संघर्ष आणि भावनिक नाट्य या सर्वांचे मिलाफ दिसणार आहे. चित्रपटाच्या पोस्टर आणि ट्रेलर रिलीज झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांच्या प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. तर अनेक चाहत्यांनी या ट्रेलरला डायनॅमिक आणि ब्लॉकबस्टर इन मेकिंग अशा कमेंट्स केल्या आहे.

भक्कम स्टारकास्ट

या चित्रपटामध्ये शाहिद कपूर आणि तृप्ती डिमरी यांच्यासह नाना पाटेकर, अविनाश तिवारी, दिशा पटानी, फरीदा जलाल, अरुण इराणी, विक्रांत मेस्सी, तमन्ना भाटिया अशी भरभक्कम स्टारकास्ट बघायला मिळत आहे. त्यामुळे हा चित्रपट कसा असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. या चित्रपटाचं माध्यमातून आपल्याला शाहिद कपूर आणि विशाल भारद्वाज यांची जोडी पुन्हा पाहायला मिळणार आहे.

हे ही वाचा : ओ रोमिओ चित्रपटाचा टिझर प्रदर्शित; स्टारकास्ट देखील आली समोर

ओ रोमिओ हा चित्रपट विशाल भारद्वाज दिग्दर्शित आहे. हा चित्रपट शाहिद कपूर  सोबतचा हा चौथा संयुक्त प्रोजेक्ट आहे. यापूर्वी त्यांनी कमीने, हैदर, रंगून या चित्रपटांमध्ये  एकत्र काम केले आहे. हा चित्रपट साजिद नाडियावाला प्रस्तुत करणार असून  नाडियावाला ग्रॅडसन एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली निर्मित करण्यात आला आहे. हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला व्हॅलेंटाईन मुहूर्तावर 13 फेब्रुवारी रोजी होणार आहे. आता या चित्रपटाच्या माध्यमातून शाहिद आणि तृप्ती डिमरी यांची केमिस्ट्री बघायला मिळेल. यासह दमदार स्टारकास्ट आपण या चित्रपटाच्या माध्यमातून पाहू शकतो. 3 मिनिटांच्या या ट्रेलर मध्ये सर्व कलाकारांचा अभिनय दाखवण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts