Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • काळीज पिळवटून टाकणारी घटना! ८ तासांपूर्वी जन्मलेल्या लेकीने लष्कारातील बापाचे घेतले अंतिम दर्शन
Top News

काळीज पिळवटून टाकणारी घटना! ८ तासांपूर्वी जन्मलेल्या लेकीने लष्कारातील बापाचे घेतले अंतिम दर्शन

heart-wrenching incident army father funeral

heart-wrenching incident army father funeral : सातारा जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना समोर आलीय. अवघ्या 8 तासाआधी जन्मलेल्या लेकीने लष्करात सेवा बजावणाऱ्या बापाचं अंतिम दर्शन घेतलं. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हळहळ व्यक्त करत आहे. पत्नीच्या प्रसूतीसाठी सुट्टीवर आलेल्या भारतीय सैन्य दलातील जवान प्रमोद जाधव यांचा अपघातात मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना साताऱ्यातील ‘दरे’ येथे घडली. नियतीच्या या क्रूर खेळामुळे संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरलीय.

हेही वाचा – दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक ठार; दोघे गंभीर

घरामध्ये नव्या पाहुण्याच्या आगमनाची तयारी सुरू असतानाच काळाने घात केला. प्रमोद जाधव यांना आई नसल्याने पत्नीच्या डिलिव्हरीसाठी ते सुमारे आठ दिवसांपूर्वी सुट्टीवर गावी आले होते. दरम्यान, काही कामानिमित्त दुचाकीवरून वाढे फाट्याच्या दिशेने जात असताना पुरुष भिक्षेकरी गृहाजवळ आयशर टेम्पोने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात प्रमोद यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची बातमी कळताच कुटुंबीयांसह गावात शोकाकुल

अपघाताची बातमी कळताच कुटुंबीयांसह गावात शोकाकुल वातावरण निर्माण झाले. आज सकाळी वीर जवान प्रमोद जाधव यांचं पार्थिव त्यांच्या मूळ गावी दरे येथे आणण्यात आले. त्याचदरम्यान त्यांच्या पत्नीने एका गोंडस बालिकेला जन्म दिला. पित्याच्या मृत्यूची बातमी आणि घरात आलेला नव्या जीवाचा आनंद, या दोन्ही भावनांनी कुटुंबीय हादरून गेले.

केवळ आठ तासांच्या चिमुकलीने आपल्या पित्याचं अंतिम दर्शन घेतल

प्रमोद यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी रुग्णालयातून थेट स्ट्रेचरवरून आलेल्या पत्नीने आणि केवळ आठ तासांच्या चिमुकलीने आपल्या पित्याचं अंतिम दर्शन घेतलं. प्रसूती वेदना सहन करत असलेल्या पत्नीने जेव्हा स्ट्रेचरवरून पतीच्या पार्थिवावर फुले वाहिली, तेव्हा उपस्थितांचं काळीज पिळवटून निघालं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts