Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • युद्धाचा परिणाम भारतातही! पुणेकरांचं टेन्शन वाढलं, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद
ताज्या बातम्या

युद्धाचा परिणाम भारतातही! पुणेकरांचं टेन्शन वाढलं, व्यावसायिक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद

pune lpg gas

Iran-Israel War Impact On Pune | अमेरिका (America), इस्त्रायल (Israel) आणि इराण (Iran) या तीन देशांमधील तणाव अधिकच वाढला आहे. या तिन्ही देशांकडून एकमेकांवर जोरदार हल्ले-प्रतिहल्ले केले जात आहेत. तर या युद्धाचे परिणाम आता अनेक देशांवर पडताना दिसत आहेत. तिन्ही देशांमधील हवाई हल्ल्यातील संघर्षात मोठ्या प्रमाणात जीवितहानी झालेली आहे. या युद्धादरम्यान अनेक देशांचे नुकसान झाले आहे.

आता या पेटलेल्या युद्धाचा परिणाम फक्त मध्यपूर्वेपुरता राहिलेला नसून आता युद्धाचे परिणाम जागतिक ऊर्जा बाजारावर दिसायला लागले आहेत. या युद्धाचा परिणाम आता जागतिक तेलपुरवठ्यावर झाला आहे. कारण इराण हा असा देश आहे जो जागतिक महत्त्वाच्या तेल उत्पादक देशांपैकी एक मानला जातो. त्यामुळे आत्ता सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक तेलपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. या युद्धामुळे कच्चा तेलाच्या किमतींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.

युद्धाचा फटका पुण्यातील गॅस पुरवठ्यावर

दुसरीकडे या युद्धाचे पडसाद भारतातही उमटू लागले आहे. विशेषत: महाराष्ट्राला या युद्धाचा मोठा फटका झाला आहे. महाराष्ट्रातील पुण्यात गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्याची माहिती समोर आली आहे. युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठा व्यवस्थेवर दबाव येण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घेता पुण्यात व्यावसायिक वापरासाठी दिल्या जाणाऱ्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला आहे. पुण्यातील घरगुती ग्राहकांना एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा, या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती समोर आली आहे.

सध्या पुण्यातील शिक्रापूर येथील भारत पेट्रोलियमच्या प्लांटमधून सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. तर चाकण येथेही हिंदुस्तान पेट्रोलियमच्या प्लांटमधून व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आला आहे. तर याबाबत डीलर्सना स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच पुढील आदेश मिळेपर्यंत कमर्शियल सिलेंडर घेण्यासाठी वाहने पाठवू नये, असे आदेशही देण्यात आले आहेत.

व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा थांबवण्यात आल्यामुळे या निर्णयाचा परिणाम पुण्यातील व्यावसायिकांवर होणार आहे. कारण पुण्यामध्ये हॉटेल, स्वीट होम्स, रेस्टॉरंट, मेस आणि केटरिंग सेवा अशा अनेक व्यवसायांमध्ये मोठ्या प्रमाणात गॅस सिलेंडरचा वापर केला जातो. आणि आता अचानक गॅस सिलेंडरचा पुरवठा बंद केल्यामुळे व्यावसायिकांच्या चिंतेत वाढ होणार आहे.

दरम्यान, इराणने केलेल्या हल्ल्यामुळे समुद्री मार्गे होणारी आयात-निर्यात ठप्प झाली आहे. याचा परिणाम पाकिस्तानसह अनेक देशांवर झाला आहे. अनेक देश संकटात सापडले आहेत. यामध्ये पाकिस्तानमधील डिझेल, पेट्रोलचा साठा झपाट्याने कमी झाला आहे. काही दिवसच इंधन साठा शिल्लक राहण्याची भीती पाकिस्तानला आहे.

पाकिस्तानमध्ये काही दिवस चालेल एवढाच इंधनसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच पाकिस्तान सरकार 20-25 दिवसांचा इंधन पुरवठा असल्याचा दावा करत आहे, तरीही मागील तीन दिवसांपासून आम्हाला काहीही मिळालेले नाही, असा दावा पाकिस्तान पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने केला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानमध्ये इंधनाची कमतरता सुरू असून त्याचा वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts