Breaking News :
Top News

कुलगाममध्ये दहशतवादी हल्ला; नाव-धर्म विचारून दोन मजुरांची हत्या

Kulgam Terror Attack

Kulgam Terror Attack : जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये एप्रिल 2025 मध्ये काही दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला…या वेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांना त्यांची जात-धर्म विचारून गोळीबार केला…या हल्ल्यात एकूण 26 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता…यामुळे देशभरात संतापाचे वातावरण पाहायला मिळाले…पाकिस्तानला एकदाच चांगला धडा शिकवायला पाहिजे, असा आक्रोश देशभरातून पाहायला मिळाला…मोदी सरकारने देखील पाकिस्तानला धडा शिकवण्याचं ठरवलं…भारताने ऑपरेशन सिंदूर ( Operation Sindoor ) राबवलं आणि पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळांना अचूक लक्ष केलं…पाकिस्तानातील 9 प्रमुख दहशतवादी तळांवर केलेल्या या अचूक हल्ल्यात 100 पेक्षा जास्त दहशतवादी जागीच ठार झाले…यानंतर असं वाटलं की आता दहशतादी परत भारताकडे वर नजर करूनही पाहणार नाही..मात्र दहशतवाद्यांनी पुन्हा पहलगामसारखाच हल्ला केला आहे…2 हिंदू कर्मचाऱ्यांना एक प्रश्न विचारला अन् धडाधड गोळ्या झाडल्या… पाहूयात की ऑपरेशन सिंदूरनंतरही दहशतवाद्यांची परत हल्ला करण्याची हिंमत कशी झाली? दहशतवादी वारंवार भारतावर हल्ला का करत आहेत? कुलगामात नेमकं काय घडलंय?

कुलगाममध्ये नेमकं काय घडलं? ( Kulgam Terror Attack )

जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा अत्यंत क्रूर आणि भ्याड पद्धतीने ‘टार्गेट किलिंग’ करत दोन निष्पाप मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली आहे… छत्तीसगडमधून पोट भरण्यासाठी काश्मीर खोऱ्यात आलेल्या या दोन हिंदू मजुरांची नावे, जात आणि धर्म विचारून दहशतवाद्यांनी त्यांना लक्ष्य केल्याची माहिती आहे… या हल्ल्याची भीषण पद्धत गेल्या वर्षी पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यासारखीच असल्याने सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क झाल्या आहेत… 31 जुलैच्या रात्री घडलेल्या या थरारक आणि वेदनादायी घटनेमुळे काश्मीर खोऱ्यातील परराज्यातील मजुरांमध्ये पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे…

हेही वाचा : महाराष्ट्रात धर्मस्वातंत्र्य कायदा लागू; बेकायदा धर्मांतरावर कडक कारवाई, जाणून

नाव आणि धर्म विचारून दोन हिंदू मजुरांवर गोळीबार ( Kulgam Terror Attack )

ही हृदयद्रावक घटना कुलगाम जिल्ह्यातील केलाम परिसरातील एका वीटभट्टीवर घडली… नेहमीप्रमाणे दिवसभराचे कष्टाचं काम संपवून मजूर रात्रीच्या वेळी विश्रांती करत होते… याच दरम्यान एका दुचाकीवरून दोन दहशतवादी हत्यारांसह वीटभट्टीवर आले… तिथे काम करणाऱ्या अनेक स्थलांतरित मजुरांना त्यांनी एकत्र उभे केले आणि एकापाठोपाठ एक सर्वांना त्यांचे नाव, जात आणि धार्मिक ओळख विचारण्यास सुरुवात केली. या संपूर्ण गराड्यात छत्तीसगडचे दोनच हिंदू मजूर होते. आपली खरी ओळख उघड होताच, दहशतवाद्यांनी त्या दोन मजुरांना बाजूला काढले आणि त्यांच्यावर अत्यंत जवळून अंधाधुंद गोळीबार केला, ( Terror Attack ) अशी माहिती आहे… या भीषण गोळीबारानंतर आजूबाजूला एकच किंकाळ्या आणि पळापळ सुरू झाली, ज्याचा फायदा घेत दहशतवादी अंधारातून पळून जाण्यात यशस्वी झाले…

या हल्ल्यात छत्तीसगड रहिवासी असलेले दीपक रात्रे वय 24 आणि भूपेंद्र भैना वय 28 हे दोन तरुण मजूर जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडले.. गोळ्यांचा आवाज ऐकून स्थानिक नागरिक आणि इतर मजुरांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत दोघांना रुग्णालयात नेण्याचा प्रयत्न केला… मात्र, दीपकचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाला होता.. तर गंभीर जखमी झालेल्या भूपेंद्रने दुसऱ्या दिवशी 1 ऑगस्ट रोजी सकाळी उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला… दीपक हा त्याच्या संपूर्ण कुटुंबातील एकमेव कमावता मुलगा होता, त्यामुळे त्याच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे…

पहलगाम हल्ल्याची पुनरावृत्ती? दहशतवाद्यांची तीच पद्धत

या भयंकर घटनेने २२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याची पुनरावृत्ती केल्याचे स्पष्ट दिसत आहे.. पहलगाममध्येही अतिरेक्यांनी पर्यटकांना आणि नागरिकांना त्यांची धार्मिक ओळख विचारून संपवले होते. सुरक्षा यंत्रणांच्या प्राथमिक तपासानुसार, कुलगाममधील या हल्ल्याची जबाबदारी लष्कर-ए-तोयबाची हस्तक संघटना असलेल्या ‘द रेजिस्टन्स फ्रंट’ (TRF) वर असण्याची दाट शक्यता आहे… ही संघटना गेल्या काही काळापासून काश्मीर खोऱ्यात बाहेरून काम करण्यासाठी येणाऱ्या गरीब मजुरांना आणि अल्पसंख्याकांना जाणीवपूर्वक लक्ष्य करत आहे…

या भ्याड आणि क्रूर हल्ल्याचे देशभरात तीव्र राजकीय पडसाद उमटले असून सर्वच स्तरांतून संताप व्यक्त केला जात आहे. जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, निष्पाप मजुरांना लक्ष्य करणे हे अत्यंत निंदनीय असल्याचं म्हटलं आहे… मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री मदत निधीतून प्रत्येकी १० लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे …तसेच उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी सुरक्षा यंत्रणांची तातडीची बैठक घेऊन काश्मीरबाहेरील मजुरांच्या सुरक्षेसाठीच्या नियमावलीचा (SOP) व्यापक आढावा घेण्याचे आणि या कृत्यामागे असलेल्या दहशतवाद्यांचा तात्काळ खात्मा करण्याचे आदेश दिले आहेत… सध्या भारतीय लष्कर, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संपूर्ण केलाम परिसराला वेढा घातला असून, स्थानिक अतिरेकी मोहम्मद लतीफ याच्यासह इतर हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे…

हेही वाचा : पुणे, सातारा आणि सोलापूरच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा! ब्रिटिशकालीन भाटघर

हल्ल्यानंतर सुरक्षा यंत्रणांनी कोणती कारवाई केली?

तर लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी देखील यावर ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे…जम्मू-काश्मीरमधील कुलगाम येथे झालेला भ्याड दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये आपल्या देशातील दोन कामगारांची हत्या झाली, ही अत्यंत दुःखद घटना आहे. मी शोकग्रस्त कुटुंबांप्रती संवेदना व्यक्त करतो…या नीच कृत्याबद्दल दहशतवाद्यांवर कठोर कारवाई केली जावी आणि त्यांना शक्य तितकी कठोर शिक्षा दिली जावी. दहशतवादाविरुद्ध संपूर्ण देश एकवटलेला आहे, असं राहुल गांधींनी ट्वीट करत म्हटलंय..

केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकार दहशतवाद्यांविरोधात जरी कठोर कारवाई करत असल्याचे म्हटलं आहे…मात्र केंद्र सरकारने ऑपरेशन सिंदूर राबवल्यानंतरही दहशतवादी पुन्हा असा हल्ला करण्याचा धाडक कसे करत आहे? असा प्रश्न निर्माण झाला आहे… कुलगाममध्ये कुणाच्या चुकीमुळे हा हल्ला घडला आहे? दहशतवादी चक्क दुचाकीवरून येत कामगारांना एकत्र गोळा करून हल्ला करतात, तोपर्यंत त्यांच्यावर कारवाई का करण्यात आली नाही? दहशवादी दुचाकीवरून फिरतात तरी सुरक्षा यंत्रणांना ही माहिती का मिळत नाही? असे अनेक प्रश्न निर्माण झाले असून तुम्हाला काय वाटतं कुणाच्या चुकीमुळे ही घटना घडली आहे? कमेंट करून नक्की सांगा…

FAQ

प्र 1. कुलगाममध्ये काय घडले?
कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांनी दोन हिंदू मजुरांची गोळ्या झाडून हत्या केली.

प्र 2. हल्ल्याची जबाबदारी कोणावर संशयित आहे?
प्राथमिक माहितीनुसार, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित TRF या संघटनेवर संशय व्यक्त केला जात आहे.

प्र 3. हल्ल्यानंतर प्रशासनाने कोणती कारवाई केली?
भारतीय लष्कर, CRPF आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी संयुक्त शोधमोहीम सुरू केली असून परिसरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

प्र 4. मृत मजूर कोणत्या राज्यातील होते?
दोन्ही मजूर छत्तीसगड राज्यातील रहिवासी होते आणि रोजगारासाठी काश्मीरमध्ये गेले होते.

प्र 5. ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय?
ऑपरेशन सिंदूर हे भारताने दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचे नाव असून त्यानंतरही हा हल्ला झाल्याने सुरक्षेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts