Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • अकोल्यात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघडकीस; मुलीचे अपहरण, पाच दिवस डांबून ठेवलं अन्…
गुन्हा

अकोल्यात ‘लव्ह जिहाद’चा प्रकार उघडकीस; मुलीचे अपहरण, पाच दिवस डांबून ठेवलं अन्…

c

Akola Love Jihad: अकोल्यात एका अल्पवयीन हिंदू मुलीला पाच दिवस घरात डांबून ठेवल्याच्या आरोपानंतर खळबळ उडाली असून पोलिसांनी तिची सुटका केली आहे. या प्रकरणात एका युवकावर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.

नाशिक आणि अमरावती, कोल्हापूरनंतर आता अकोला जिल्ह्यातही धक्कादायक प्रकार समोर आला असून, “लव्ह जिहाद”चा आरोप करत परिसरात खळबळ उडाली आहे. प्रेमाच्या नावाखाली एका विवाहित मुस्लीम तरुणाने हिंदू तरुणीचे अपहरण करून तिला पाच दिवस घरात डांबून ठेवल्याचा आरोप करण्यात आला आहे. अखेर खदान पोलिसांनी संबंधित तरुणीची सुटका केली. या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.

हेही वाचा: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी भाजपकडून ५ उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली संधी, कोणाचा पत्ता कट?

मिळालेल्या माहितीनुसार, अकोल्यातील जमीर जाहीरउद्दीन काझी हा विवाहित मुस्लिम तरुण असून त्याला एक मूल आहे. तो गेमिंग ॲपवर ‘बादशाह’ या नावाने बनावट प्रोफाइल वापरत असल्याचा आरोप आहे. या माध्यमातून त्याने अनेक तरुणींशी संपर्क साधल्याचे सांगितले जाते. यातील हरियाणा राज्यातील एका हिंदू तरुणीशी त्याची ओळख झाली आणि त्यातून जवळीक वाढली.

त्यानंतर प्रेमाच्या आमिषाने तिला अकोल्यात बोलावण्यात आले. गीता नगर परिसरातील त्याच्या घरात तिला पाच दिवस ठेवण्यात आले, असा आरोप आहे. दरम्यान, तरुणीने घरी आई रागावल्यामुळे तिला घरी राहायचे नाही, असे सांगितले होते. याच परिस्थितीचा फायदा घेत तिचे ‘ब्रेनवॉश’ करून तिला स्वतःजवळ ठेवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात हरियाणा पोलिसांत अपहरणाचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले जाते. दरम्यान, तरुणीचा भाऊ शोध घेत अकोल्यात दाखल झाला आणि त्याने खदान पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर प्रकरण उघडकीस आले. सध्या जमीर काझी पोलिसांच्या ताब्यात असून त्याला लवकरच हरियाणा पोलिसांच्या स्वाधीन केले जाणार असल्याची माहिती आहे.

या संपूर्ण प्रकरणाला ‘लव्ह जिहाद’ची किनार असल्याचा आरोप विश्व हिंदू परिषदेने केला आहे. पाच दिवसांत तरुणीसोबत नेमके काय घडले, याचा सखोल तपास व्हावा, अशी मागणीही संघटनेने केली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts