• Home
  • महाराष्ट्र
  • Maharashtra Teacher Document Verification: मोठी अपडेट! राज्यातील 3 लाख शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी; जाणून घ्या गायब शिक्षकांची आकडेवारी
Top News

Maharashtra Teacher Document Verification: मोठी अपडेट! राज्यातील 3 लाख शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी; जाणून घ्या गायब शिक्षकांची आकडेवारी

Maharashtra Teacher Document Verification

Maharashtra Government Orders Re-verification of 3 Lakh School Staff Documents: राज्यातील खासगी अनुदानित शाळांमधील ३ लाख शिक्षक- कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची फेरतपासणी करण्यात येणार आहे. पडताळणीदरम्यान २७९६ शिक्षकांची माहिती गायब असल्याचे समोर आले असून याप्रकरणी सखोल चौकशी सुरू झाली आहे.

राज्यातील खाजगी अनुदानित शाळांमध्येकार्यरतअसलेल्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या कागदपत्रांची मोठ्या प्रमाणावर पडताळणी करण्यात येणार आहे. शालार्थ आयडीशी संबंधित गैरप्रकार तपासण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाला (एसआयटी) अहवाल सादर करण्यासाठी आणखी ३ महिन्यांची मुदत देण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

हेही वाचा: Ram Navami 2026: यंदा रामनवमी कधी 26 की 27 मार्च? जाणून घ्या तारीख, शुभ मुहूर्त आणि पूजा कशी करावी

शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार, १८ नोव्हेंबर २०१६ ते जुलै २०२५ या कालवधीत नियुक्त झालेल्या आणि शालार्थ आयडीद्वारे वेतन घेणाऱ्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कागदपत्रे ऑनलाईन प्रणालीवर अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये नियुक्ती आदेश, वैयक्तिक मान्यता आदेश, शालार्थ आयडी आदेश आणि रुजू अहवाल यांसारख्या महत्वाच्या कागदपत्रांचा समावेश आहे.

शालार्थ प्रणालीतील संभाव्य बनावटगिरीचा तपास करण्यासाठीपुण्याचे विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत वरिष्ठ पोलीस अधिकारी तसेच शिक्षण विभागातील अधिकारी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. सुरुवातीला समितीला ३ महिन्यांत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. मात्र संबंधित कालावधीतील माहिती गोळा करण्यास उशीर झाल्याने तपास पूर्ण करण्यासाठी अधिक वेळ लागणार आहे.

कागदपात्रांची काटेकोर तपासणी

समितीच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि श्रेत्रीय स्तरावरील अधिकारी सर्व कागदपत्रांची सविस्तर पडताळणी करणार आहेत. अंतिम तपासणी पूर्ण झाल्यानंतर समिती राज्य शासनाला अहवाल सादर करेल.

सुमारे अडीच हजार कर्मचाऱ्यांची माहिती अद्याप नाही

शासनाने सर्व अनुदानित शाळांना कर्मचाऱ्यांची कागदपत्रे निश्चित मुदतीत अपलोड करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, अनेक शाळांनी अद्याप माहिती सादर केलेली नाही. उपलब्ध आकडेवारीनुसार प्राथमिक शाळांमधील 709 आणि माध्यमिक शाळांमधील 2087 कर्मचाऱ्यांची माहिती अजूनही प्रणालीवर अपलोड झालेली नाही.

राज्यातील शिक्षक-कर्मचारी संख्या

प्राथमिक शिक्षण: 48,898

माध्यमिक शिक्षण: 2,51,987

माहिती न दिलेले कर्मचारी: 2,796

एकूण कर्मचारी: 2,95,885

सुनावणीनंतर निर्णय

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, ज्यांनी अद्याप कागदपत्रे सादर केलेली नाहीत त्यांची लवकरच सुनावणी घेण्यात येईल. संबंधित प्रकरणांवर एक महिन्याच्या आत निर्णय घेऊन पुढील कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts