Top News

दहावीच्या निकालात मराठीची बत्ती गुल, ८० हजारांहून अधिक विद्यार्थी नापास

Marathi subject SSC result

Marathi subject SSC result : आज राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल आज जाहीर झाला. कुठे पेढे वाटले गेले, कुठे जल्लोष केला गेला. पण या जल्लोषाच्या गर्दीत एक अशी आकडेवारी समोर आली आहे, जी विचार करायला भाग पाडणारी आहे. महाराष्ट्राची मातृभाषा असलेल्या मराठी विषयात, यंदा हजारो विद्यार्थ्यांच्या ‘बत्ती गुल’ झाल्याचं चित्र या निकालातून समोर आल आहे. राज्यात सध्या मराठी भाषेच्या अस्मितेवरून राजकारण तापलेलं असतानाच, शिक्षण क्षेत्रातून एक अस्वस्थ करणारी आकडेवारी समोर आलीये.

मराठी राज्याची मातृभाषा असूनही, यंदा मराठी विषयातचा तब्बल ९४ हजार ५४४ विद्यार्थी नापास झाले आहेत.. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, यातले ८० हजारांहून अधिक विद्यार्थी हे मराठी माध्यमाचेच आहेत. या परीक्षेसाठी सुमारे १५ लाख ४२ हजार ४७२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यामधून १४ लाख ४७ हजार ९२८ विद्यार्थी पास झाले. तर नापास झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या आहे ही ९४ हजार ५४४ आहे. यामध्ये मराठी माध्यमातील ८० हजार ८०४ विद्यार्थी नापास झाले आहेत.

इथेच खरी गम्मत आहे कि, ज्यांची मातृभाषा मराठी, ज्यांचं शिक्षणाचं माध्यम मराठी, अशा ८० हजारांहून अधिक मुलांच्या मराठीत दांड्या उडाल्या आहेत, इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांच्या तुलनेत मराठी माध्यमाचा निकाल ‘मराठी’ विषयातच कमी लागला आहे. एकूणच मराठी विषयाचा निकाल हा इतर विषयांच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी लागला आहे. महाराष्ट्रात मराठी मातृभाषा असूनही या विषयाचा निकाल कमी हा चिंतेचा विषय नक्कीच आहे.
मराठीचा निकाल कमी का लागला यामागे काही कारण असू शकतात, संभाव्यता… अवांतर वाचनाचा अभाव:, सोशल मीडिया आणि MOBILE मधील इंग्रजी चॅटिंगमुळे विद्यार्थ्यांमध्ये मराठी पुस्तकं किंवा वर्तमानपत्रे वाचण्याची सवय कमी झाली आहे. यामुळे शब्दांची ओळख आणि मराठीचे कौशल्य कमी पडत आहे.

मराठी माध्यमाच्या पोरांना ‘मराठी’ जड जातंय

इंग्रजी भाषेचा वाढता प्रभाव: मराठी लेखनातील मराठीत व्याकरण, शुद्धलेखन आणि स्वतःच मत मांडताना देखील विद्यार्थ्यांना अडचणी येतात. अनेकदा विद्यार्थी उत्तरं नीट लिहू न शकल्याने गुण कापले जातात. अशी काही करणे असू शकतात…. तरीही मराठी माध्यमातील विद्यार्थ्यांची स्थिती: धक्कादायक म्हणजे मराठी माध्यम असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नापास होण्याचे प्रमाण जास्त आहे. काही शिक्षणतज्ज्ञांच्या मते, मराठी घरांत बोलली जाणारी भाषा आणि पाठ्यपुस्तकातील प्रमाण भाषा यात तफावत असल्याने विद्यार्थ्यांना पेपर कठीण वाटतो. बघा ना, मराठी माध्यमाचा निकाल ९२.५७ टक्के आहे, तर सेमी-इंग्रजी माध्यमाचा निकाल ९६.६८ टक्के लागलाय. म्हणजेच काय, तर मराठी माध्यमाच्या पोरांना ‘मराठी’ जड जातंय आणि इंग्रजीची वाट धरलेली मुलं पुढे जातायत. राजभाषेचा दर्जा मिळालेला असतानाही राज्यात सुमारे ९४,५४४ विद्यार्थी मराठीत नापास होणे ही खरंच चिंतेची बाब आहे.

सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांत मराठी विषयाची उत्कृष्ट कामगिरी

मराठी भाषेचा विचार करता, कोकण विभागातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी इत्यादी जिल्ह्यांची कामगिरी मराठी विषयात उत्कृष्ट राहिली आहे. याउलट छत्रपती संभाजीनगर आणि लातूर या विभागांतील काही भागांत मराठी या विषयात नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे दिसून आलंय. घरात बोलली जाणारी मराठी आणि पाठ्यपुस्तकातील प्रमाणभाषा यात जरी तफावत असली तरी इतक्या विद्यार्थ्यांनी आपल्या मातृभाषेत आपल्या मराठीत नापास होणे हि चिंतेचीच बाब आहे, राज्यात मराठीचा मुद्दा कितीही गाजत असला तरीही सुरुवात इथून व्हायला पाहिजे, मराठीला ‘अभिजात’ भाषेचा दर्जा मिळवण्यासाठी आपण लढलो, मराठीच्या नावावर राजकारण करतोय… पण जर आपल्याच घरची मुलं मराठीत नापास होणार असतील, तर हा दर्जा आणि हे राजकारण काय कामाचं? मराठी ही फक्त बोलण्याची भाषा राहू नये, ती जगण्याची आणि ज्ञानाची भाषा झाली पाहिजे.. महाराष्ट्राच्या निकालात जर मराठीच्याच ‘दांड्या’ उडणार असतील, तर मराठीला न्याय कोण देणार? तुम्हाला काय

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts