• Home
  • राजकारण
  • सुनेत्रा पवार २०२९ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार, जय पवार यांचे मोठं विधान
Top News

सुनेत्रा पवार २०२९ मध्ये मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवार, जय पवार यांचे मोठं विधान

Sunetra Pawar CM candidate 2029

Sunetra Pawar CM candidate 2029 : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे अपघाती निधन झाले. त्यामुळं रिक्त झालेल्या पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांनी विक्रमी मतांनी विजय मिळवला. सध्यातरी अजित पवारांच्या राजकीय वारसदार सुनेत्रा पवार यांच्याकडे पाहिलं जात आहे. मात्र, बारामतीमधील (Baramati) मतदानादिवशीच 2029 च्या निवडणुकीत (2029 Election) बारामतीतून कोण? याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता जय पवार (Jai Pawar) यांनी मोठं वक्तव्य केलंय.

जय पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आलं आहे. आता ही चर्चा बारामतीच्या एक जागेसाठी न राहात राज्याच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहोचली आहे. आता जय पवार यांनी 2029 च्या निवडणुकीवर भाष्य केलं. विशेष म्हणजे सुनेत्रा पवार 2029 च्या मुख्यमंत्री म्हणून निवडणूक लढवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय.

मी इथेच सर्वांसाठी काम करेल – जय पवार

सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्त्वाचा राजीनामा दिल्याने खासदारकीची जागा रिकामी झाली आलीय. या ठिकाणी जय पवार यांच्या नावाची चर्चा असल्याचे पत्रकारांनी त्यांना विचारलं. त्यावर जय पवार यांनी खास उत्तर दिलंय. चर्चा होतेय पण मी इथेच सर्वांसाठी काम करेल, असं म्हणत त्यांनी आपण खासदार म्हणून जाणार नसल्याचं स्पष्ट केलं. तसेच, बारामतीत 2029 च्या विधानसभेच्या निवडणुकांच्या अनुषंगानेही जय पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे

काही दिवसांपूर्वी आमची सहकाऱ्यांसोबत चर्चा झाली, सर्वच बारामतीकरांची इच्छा होती की, दादांना एकदा मुख्यमंत्री पाहायचं आहे. आता, वहिनी देखील खूप कष्ट घेत आहेत, मला वाटतं 2029 ला बारामतीतून विधानसभेला वहिनीच उभा राहतील आणि आमची सर्वांची आशा आहे की, सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री म्हणून ती जागा घ्यायला पाहिजे, असे वक्तव्य जय पवार यांनी केले आहे.

सुनेत्रा पवार ह्याच मुख्यमंत्री बनून दादांची इच्छा पूर्ण करतील

अजित पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं ही बारामतीकरांसह राज्यातील अनेकांची इच्छा होती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. मात्र, अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याने ती इच्छा अपूर्ण राहिली. मात्र, आता सुनेत्रा पवार ह्याच मुख्यमंत्री बनून दादांची इच्छा पूर्ण करतील अशी आशा राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि बारामतीकर बाळगत आहेत. त्यातच, आज जय पवार यांनी 2029 मध्ये सुनेत्रा पवार ह्याच बारामतीच्या उमेदवार असतील हे स्पष्ट केले, मात्र मुख्यमंत्रीपदाच्या उमदेवार म्हणून त्या निवडणूक लढवती अशी आम्हाला आशा असल्याचंही त्यांनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts