• Home
  • राजकारण
  • ज्योतिषी अशोक खरातसोबत रूपाली चाकणकरांचं नेमंक काय कनेक्शन? सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, म्हणाल्या, “या माणसाला त्यांनी…”
Top News

ज्योतिषी अशोक खरातसोबत रूपाली चाकणकरांचं नेमंक काय कनेक्शन? सुषमा अंधारेंचे गंभीर आरोप, म्हणाल्या, “या माणसाला त्यांनी…”

sushma andhare

Ashok Kharat | ज्योतिषी अशोक खरातचा (Ashok Kharat) खरा चेहरा आता सर्वांसमोर आला आहे. नाशिक पोलिसांनी (Nashik Police) नराधम अशोक खरातला अटक केली आहे. एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार करत बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी खरातला बेड्या ठोकल्या आहेत. बड्या राजकीय नेत्यांचे, उद्योगपतींचे आणि सेलिब्रिटींचे भविष्य सांगणारा ज्योतिषी म्हणून अशोक खरातची ओळख होती. तर आता त्याचा काळा कारनामा उघड झाला असून नाशिकसह राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – दिल्ली हादरली! पालममधील इमारतीला भीषण आग; 9 जणांचा होरपळून मृत्यू, बचावकार्य सुरू

एका 35 वर्षीय महिलेवर अत्याचार केल्याप्रकरणी ज्योतिषी अशोक खरातला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे. यानंतर आरोपी अशोक खरातचे अनेक काळे कारमाने समोर आले आहेत, ज्यामुळे पोलिसांना देखील मोठा धक्का बसला आहे. पीडित महिलेने नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात अशोक खरातविरूद्ध तक्रार दाखल केली होता. पीडितेच्या तक्रारीची नोंद घेत पोलिसांनी सापळा रचून बुधवारी (18 मार्च) अशोक खरातला आपल्या ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. पहाटे 3 वाजता पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

आरोपी अशोक खरातसोबत रूपाली चाकणकरांचे नेमके काय कनेक्शन?

बलात्काराच्या आरोपात अटक केलेल्या अशोक खरातसोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचे (Rupali Chakankar) जवळचे संबंध असल्याचं म्हटलं जात आहे. अशोक खरात हा रूपाली चाकणकरांचा गुरू असल्याचा आरोप केला जात आहे. याबाबत आता शिवसेना उबाठाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकरांविरोधात गंभीर आरोप केले आहेत.

सुषमा अंधारेंनी काय केले आरोप?

सुषमा अंधारे यांनी ‘एक्स’वर पोस्ट शेअर करत म्हटलं आहे की, रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली… कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली. खरात याच्यावर बलात्कार, योन शोषण यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्हमधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर, तटकरे, चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे. अनेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत.

पुढे त्या म्हणाल्या, विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकरांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता. विशेष म्हणजे खरातने स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरातच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का की अशा माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे?, असे आरोप करत सुषमा अंधारेंनी रूपाली चाकणकरांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

दरम्यान, अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. त्याने आत्तापर्यंत 154 देशांचा दौरा केला असल्याचा दावा केला जात आहे. तसेच तो मोठा अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे त्याच्या संपर्कात अनेक बडे राजकीय नेते, उद्योजग होते. यामध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं भविष्य सांगितलं होतं.सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथे असलेल्या ‘श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट’चा खरात अध्यक्ष आहे. तर एकनाथ शिंदेंनी नोव्हेंबर 2022 मध्ये त्याच्या मंदिराला भेट दिली होती. त्यावेळी त्यांने शिंदेंचं भविष्य सांगितलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts