• Home
  • राजकारण
  • एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय?
लाईफस्टाईल

एकनाथ शिंदे यांची तब्येत बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल; नेमकं काय झालंय?

Eknath Shinde Health

Eknath Shinde Health: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ठाण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू असून नेमकं काय झालं आहे, हे जाणून घेऊया.

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने ठाण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सततच्या राजकीय कामकाज आणि व्यस्त कार्यक्रमांमुळे त्यांच्यावर ताण आल्याचे सांगितले जात असून सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

हेही वाचा: उद्धव ठाकरेंना तिसरा धक्का! शुभांगी पाटील यांचा काल एकनाथ शिंदे गटात प्रवेश; जाणून घ्या कोण आहेत त्या

अचानक प्रकृती खालावली

मिळालेल्या माहितीनुसार, सततच्या कामाचा ताण आणि राजकीय दौऱ्यांमुळे एकनाथ शिंदे यांना थकवा जाणवू लागला होता. काही दिवसांपासून ते खूप व्यक्त होते. विधिमंडळाचे कामकाज आणि विविध राजकीय बैठका यामुळे त्यांच्यावर मोठा ताण निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयात उपचार सुरू

सध्या ठाण्यातील रुग्णालयात डॉक्टरांचे पथक त्यांच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे. प्राथमिक उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, पुढील काही तास निरीक्षणाखाली ठेवले जाणार असल्याची माहिती आहे.

पक्षप्रवेश कार्यक्रमाला गैरहजेरी

काल रात्री पार पडलेल्या शिवसेना (ठाकरे गट) नेत्या शुभांगी पाटील यांच्या पक्षप्रवेश कार्यक्रमाला एकनाथ शिंदे उपस्थित नव्हते. या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते.

मूळ नियोजनानुसार, या कार्यक्रमाला एकनाथ शिंदे स्वतः उपस्थित राहणार होते, मात्र प्रकृती बिघडल्यामुळे ते सहभागी होऊ शकले नाहीत.

राजकीय हालचाली सुरूच

गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी सुरू आहेत. विविध पक्षांतील नेत्यांचे पक्षांतर, बैठका आणि संघटनात्मक बदल यामुळे राजकीय वातावरण तापलेले आहे.

अशा व्यस्त कार्यक्रमांदरम्यान शिंदे यांच्यावर मोठा ताण आला असल्याचे मानले जात आहे.

डॉक्टरांचे बारकाईने निरीक्षण

डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीवर विशेष लक्ष ठेवले असून आवश्यक ती सर्व वैद्यकीय काळजी घेतली जात आहे. पुढील काही तास त्यांची प्रकृती कशी राहते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, शिंदे यांच्या प्रकृतीबाबत अधिकृत माहिती लवकरच समोर येण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts