Breaking News :
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • ऐन परीक्षेच्या तोंडावर पावसाचा अडथळा; आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ९ जुलैच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या
महाराष्ट्र

ऐन परीक्षेच्या तोंडावर पावसाचा अडथळा; आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या ९ जुलैच्या सर्व परीक्षा पुढे ढकलल्या

MUHS July 9 Exam Postponed

MUHS July 9 Exam Postponed: नाशिकमध्ये गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ९ जुलै रोजी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिकसह (Nashik) परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक भागांमध्ये रस्त्यांवर पाणी साचणे, वाहतुकीवर परिणाम होणे आणि नागरिकांना दैनंदिन कामकाजासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हवामान खात्याने नाशिक जिल्ह्यासाठी उद्या येलो अलर्ट (Nashik Yellow Alert) जारी केला असून, आणखी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा: ममता बॅनर्जींचा राग अनावर? आंदोलनात पक्षाच्या कार्यकर्त्याला मारली कानाखाली; पाहा व्हिडिओ

विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने (MUHS) ९ जुलै रोजी होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय (MUHS July 9 Exam Postponed) घेतला आहे. प्रतिकूल हवामानामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा (Student Exam Postponed) केंद्रांपर्यंत पोहोचताना अडचणी निर्माण होऊ शकतात, तसेच त्यांच्या शैक्षणिक हिताचे नुकसान होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे.

वेळापत्रकाची अधिकृत घोषणा लवकरच ( Official announcement of the schedule soon)

विद्यापीठाने विद्यार्थ्यांना घाबरून न जाता परीक्षांच्या सुधारित वेळापत्रकाची अधिकृत घोषणा लवकरच करण्यात येईल, असे सांगितले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या अधिकृत सूचनांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

हवामान विभागाचा आव्हान

दरम्यान, प्रशासनानेही नागरिकांना आवश्यक नसल्यास घराबाहेर पडणे टाळण्याचे, तसेच हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळे जिल्हा प्रशासन परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असून, आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts