• Home
  • मनोरंजन
  • विशाल लास्ट वॉर्निंग आहे, मला हात लावू नको…, ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा
मनोरंजन

विशाल लास्ट वॉर्निंग आहे, मला हात लावू नको…, ‘बिग बॉस’च्या घरात मोठा राडा

lucknow 2

Bigg Boss Marathi 6 | ‘बिग बॉस मराठी 6’ (Bigg Boss Marathi 6) हा सीझन सध्या चांगलाच गाजताना दिसत आहे. या सीझनमधील प्रत्येक खेळाडूचा खेळ रंगात येताना दिसत आहे. प्रत्येकजण स्वत:ला सेफ करण्यासाठी पूर्ण जोमाने प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच आता बिग बॉसच्या घरात मोठा राडा झाला आहे.

हेही वाचा – सगळं करून भागली अन् आता देवपूजेला लागली…, प्रेमानंद महाराजांचं दर्शन घ्यायला ‘ती’ बोल्ड अभिनेत्री गेली अन् ढसाढसा रडली

नुकताच बिग बॉसने सोशल मीडियावर नव्या एपिसोडचा प्रोमो शेअर केला आहे. ज्यामध्ये विशाल कोटियन (Vishal Kotiyan) यानं असं काही केलं आहे की ज्यामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे.

प्रोमोमध्ये दाखवल्याप्रमाणे, बिग बॉसच्या घरात गणिताचा तास सुरू असतो. हा गणिताचा तास सुरू असताना विद्यार्थ्यांनी अभ्यास नाही तर राडाच केला आहे. तर या टास्कमध्ये प्रत्येक स्पर्धकानं पाठीवरून बॉल पुढे न्यायचा होता. यादरम्यान प्रत्येकजण आपला खेळ प्रामाणिकपणे खेळत असताना मागून अचानक विशाल येतो आणि तो राखीला (Rakhi Sawant) उचलचो आणि स्विमिंग पूलजवळ घेऊन जातो. त्यानंतर विशाल म्हणतो, “आई शपथ घेऊन सांगतो पुढच्या वेळी फेकून देईन..” , विशालने मागून उचलल्यामुळे राखी प्रचंड संतापते आणि मग राडा होतो.

https://www.instagram.com/reel/DVK0oVgiFDp/?utm_source=ig_web_copy_link

राखी संतापत विशालला म्हणते, विशाल तुला ही शेवटती वॉर्निंग आहे..मला हात लावू नको. नंतर राखी रागाच्या भरात जवळचा टेबलही ढकलून देते. या प्रसंगामुळे घरातील वातावरण चांगलंच तापलं आहे. सध्या राखी आणि विशालचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts