• Home
  • मनोरंजन
  • धुरंधर चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 28.36 कोटी रुपयांची कमाई
मनोरंजन

धुरंधर चित्रपटाने पहिल्या दिवशी केली 28.36 कोटी रुपयांची कमाई

Movie poster of Dhurandhar starring Ranveer Singh, representing its first day box office success

Dhurandhar Day 1 box office : धुरंधर हा चित्रपट शुक्रवारी संपूर्ण चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. पाहिल्याचदिवशी या चित्रपटाने जबदस्त कमाई केली असून बॉक्स ऑफिसवर जबरदस्त प्रतिसाद मिळवला आहे.

या चित्रपटाच्या रिलीज पूर्वी चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु होती. चित्रपटाती मुख्य जोडी रणबीर सिंग आणि सारा अर्जुन यांची जोडी वयाच्या अंतरामुळे एकत्र कशी दिसेल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले गेले होते. त्यानंतर या चित्रपटाचा ट्रीजर रिलीज झाला. आणि सर्वांची चित्रपट पाहण्याची उत्सुकता शिगेला पोहोचली. आता या चित्रपटाने रिलीज झाल्यानंतर पहिल्याच दिवशी 28.36 कोटी रुपयांची कमाई केली आहे. हि कमाई चित्रपटाच्या यशासाठी मजबूत सुरुवात असल्याचे मानले जात आहे.

धुरंधर या चित्रपटाने पहिल्याच दिवशी 28.36 कोटी रुपयांची कमाई आहे. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच दिवशी चित्रपटाने जबरदस्त सुरुवात केली. हा चित्रपट शनिवार रविवार आल्याने या विकेंडला आणखी जबरदस्त कमाई करेल. अशी अशा आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर अभिनेत्री दीपिका पादुकोणने चित्रपटातील मुख्य अभिनेता रणवीर सिंहचे कौतुकरत सोशल मीडियावर पोस्ट केली. याशिवाय अनेक अभिनेत्यांनी देखील या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या.

हे ही वाचा : ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे…’ मधील पात्राच्या ब्रॉंझ पुतळ्याचे अनावरण; SRK ने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

काय आहे चित्रपटाची कहाणी

धुरंधर चित्रपटाची कहाणी हळूहळू पुढे सरकताना दिसते. भारतात प्लेन हायजॅक आणि 2001 मध्ये संसदेवर झालेल्या गोळीबार आणि दहशवादी हल्ल्यांवर आधारित आहे. भारतातून आपले एजेंट पाकिस्थानी अंडरवर्ल्ड, माफिया आणि गँग्सला संपवण्यासाठी पाठवतात. या चित्रपटाची कहाणी ही सत्य घटनेवर आधारित असून हळुहळु पुढे सरकते. हा संपूर्ण चित्रपट साडेतीन तसंच आहे. पण हा चित्रपट बोर होता प्रेक्षकांना खिळवून ठेवण्यास मदत करतो. चित्रपट जसजसा पुढे जातो तशी उत्सुकता शिगेला जाते. या चित्रपटातील अभिनेत्री सारा अर्जुनचा अभिनय ठीकठाक आहे, काही ठिकाणी तिचे काम कमी पडत असल्याचे दिसतं. चित्रपटातील अक्षय खन्नाचा अभिनय देखील प्रेक्षकांना आवडत आहे. त्याचे हावभाव बोलके असल्याने तो डायलॉग पेक्षा डोळ्यांनी संवाद साधत असल्याचे काही ठिकाणी वाटते.

आदित्य धार यांचे दिग्दर्शन

धुरंधर हा चित्रपट 5 डिसेंबर रोजी सिनेमागृहात प्रदर्शित झाला. हा स्पाय अॅक्शन थ्रिलर चित्रपट असून  हा चित्रपट आदित्य धर यांनी लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला आहे .  तर या चित्रपटाचे  सह निर्माता म्हणून देखील त्यांनी काम केले आहे. या चित्रपटात रणवीर सिंग , संजय दत्त , अक्षय खन्ना , आर. माधवन आणि अर्जुन रामपाल यांच्यासह सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे सहाय्यक भूमिकांमध्ये दिसत आहेत. धुरंधर चित्रपटाचे  संगीत शास्वत  सचदेव यांनी दिले असून गीते कुमार आणि इर्शाद कामिल यांनी ही गाणे लिहिली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts