• Home
  • मनोरंजन
  • पंचायत सिझन 5 येणार प्रेक्षकांच्या भेटीला ? जाणून घ्या काय आहे अपडेट
मनोरंजन

पंचायत सिझन 5 येणार प्रेक्षकांच्या भेटीला ? जाणून घ्या काय आहे अपडेट

panchayat season 5

Panchayat Season 5 Update : आजकाल चित्रपटांपेक्षा जास्त वेब सिरीजची चर्चा बघायला मिळते. त्यापैकी सर्वात गाजलेली आणि बहुप्रतीक्षित सिरीज म्हणजे पंचायत. या वेब सिरीजची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असतात. या वेब सीरिजचे आतापर्यंतचे 4 सिझन अप्रतिम गाजले. आता पंचायत सिरीजचा 5 वा सिझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे, या नवीन सिझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत असून आता प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

पाचव्या सिझनची घोषणा

पंचायतचा चौथ्या सिझन प्रचंड गाजला. हा सिझन भारतातच नाही तर परदेशात देखील प्रचंड गाजला. आता पुढील सिझन म्हणजेच पंचायत सिझन 5 मे किंवा जून 2026 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. पंचायत सिझन 4 प्रेक्षकांच्या भेटीला आल्यानंतर काही काळानंतर लगेच पंचायतच्या निर्मात्याने पाचव्या सिझनची अधिकृत घोषणा केली होती. एवढंच नाही तर या पाचव्या सीझनचे पहिले पोस्टर देखील रिलीज करण्यात आले होते. या पोस्टरच्या माध्यमातून सिरीजचा फर्स्ट लूक समोर आला होता.

पंचायत सिरीज केव्हा झाली सुरु

पंचायत सिरीजचा पहिला सिझन 3 एप्रिल 2020 रोजी रिलीज झाला होता. त्यानंतर पंचायतचा दुसरा सिझन तब्बल 2 वर्षानंतर म्हणजे 18 मे 2022 रोजी प्रदर्शित करण्यात आला. एवढेच नाही तर पंचायतीचा तिसरा सिझन 28 मे 2024 रोजी तर चौथा सिझन 24 जून 2025 रोजी प्रदर्शित करण्यात आला. आता पाचव्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट बघत आहे.

हे ही वाचा : धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता; बॉर्डर 2 चित्रपटाने प्री तिकीट सेल मध्ये केली कोट्यवधींची कमाई

ही स्टारकास्ट असणार सिझन 5 मध्ये

मीडिया रिपोर्टनुसार, पंचायत 5 सिरीज जून आणि जुलै 2026 मध्ये अमेझॉन प्राईम व्हिडीओ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीम करण्यात येऊ शकतो. परंतु याबाबत अजूनही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर याचवर्षी प्रेक्षकांच्या भेटीला ही वेब सिरीज येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पंचायत 5 या सिरीजमध्ये जितेंद्र कुमार यांच्यासोबतच नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, सान्वीका, दुर्गेश कुमार, सुनीता राजवार, अशोक पाठक आणि पंकज झा हे कलाकार असणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts