Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • अजित पवारांचं अपघाताच्या 8 मिनिटांआधी फोनवर शेवटचं संभाषण, कॉल रेकॉर्डिंग समोर; काय म्हणाले दादा?
Top News

अजित पवारांचं अपघाताच्या 8 मिनिटांआधी फोनवर शेवटचं संभाषण, कॉल रेकॉर्डिंग समोर; काय म्हणाले दादा?

Ajit Pawar Last Call

Ajit Pawar Last Call : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेवटच्या क्षणी मोबाईलवर झालेल्या संभाषणाची एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. विमानात असताना त्यांचं शेवटचं मोबाईल संभाषण काटेवाडी येथील त्यांच्या गावातील एका कार्यकर्त्या आणि जवळच्या सहकाऱ्याशी झालं होतं. आज श्रीजित पवार यांनी बारामती इथं पत्रकार परिषदेत ही ऑडिओ क्लिप प्रसिद्ध केली. अजित पवार यांनी शेवटपर्यंत सर्व जाती आणि सामाजिक गटांना एकत्र आणण्याची आपली वचनबद्धता कायम ठेवल्याचं यातून दिसत आहे.

शेवटच्या फोन कॉलमध्ये काय झालं बोलणं :

  • अजित पवार – तुम्हाला माहिती नसतं काय नसतं, काहीतरी उगाच, आम्ही पण सगळ्या जाती धर्माला आम्ही सोबत घेऊन जातो.
  • श्रीजीत पवार – मला जे वाटलं ते मी तुम्हाला सांगितलं.
  • अजित पवार – मान्य आहे, परंतु तसं नाही, तुमचं सांगणं बरोबर आहे, परंतु त्याच्यात माळी समाजाला मी जिल्हा परिषदेला उमेदवारी आता दिलेली आहे, तिथं जिथं ओबीसीचा रिझर्वेशन होतं बाकीच्यांना दिलं नाही, इथं पक्षानं दुसरे दिलेले आहेत, त्या पद्धतीने आपण केलेलं आहे.
  • श्रीजीत पवार – चालेल दादा तुम्हाला जे वाटतं ते निर्णय घ्या,
  • अजित पवार – ठीक आहे ओके.

कोण आहे श्रीजित पवार :

गोविंदराव पवार हे अजित पवार यांचे आजोबा होते. गोविंदराव पवार यांचे सख्खे बंधू ग्यानबा पवार व गुलाबराव पवार होते. ग्यानबा पवार यांचे चिरंजिव असलेल्या तुकाराम पवार यांचे श्रीजित हे नातू आहेत. नात्यानं अजित पवार यांचे श्रीजित पवार हे पुतणे आहेत.

अपघाताच्या आठ मिनिटांआधी झाला संवाद :

अपघाताच्या दिवशी अजित पवार बारामती नगरपरिषद निवडणुकीसाठी प्रचार करत होते. अपघातापूर्वी त्यांनी त्यांचे पुतणे श्रीजित यांच्याशी फोनवर तयारीबाबत बोलले होते. सकाळी 8:37 वाजता संभाषण झालं होतं, तर विमान सकाळी 8:45 वाजता कोसळले. याचा अर्थ अपघाताच्या आठ मिनिटांआधी हा संवाद झाला होता.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts