Breaking News :
  • Home
  • महाराष्ट्र
  • शिंदे गटावर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; ‘पैसा फेको, तमाशा देखो’ म्हणत गंभीर आरोप
राजकारण

शिंदे गटावर संजय राऊतांचा जोरदार हल्लाबोल; ‘पैसा फेको, तमाशा देखो’ म्हणत गंभीर आरोप

Sanjay Raut Statement
Sanjay Raut Statement: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटावर जोरदार टीका केली. पत्रकार परिषदेत बोलताना राऊत यांनी पक्षांतर, निधी वाटप आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करत अनेक गंभीर आरोप केले.

“आमचा संघर्ष हा लाईव्ह आहे. त्यात भावना आहेत, नाट्य आहे आणि राजकीय संघर्ष आहे,” असे म्हणत राऊत यांनी आपल्या भूमिकेचे समर्थन केले. नाशिक विधानपरिषद निवडणुकीत शिंदे गटाचा पराभव झाल्यानंतर अवघ्या काही तासांत काही नेत्यांना आपल्या बाजूला वळविण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. “सध्या पैसा फेको, तमाशा देखो असे राजकारण सुरू आहे,” असा आरोपही त्यांनी केला. (Sanjay Raut Statement)

खासदारांवर राऊतांचा निशाणा

राऊत यांनी पक्ष सोडून गेलेल्या काही खासदारांवरही निशाणा साधला. “फुटलेल्या खासदारांना कोट्यवधी रुपयांची ऑफर देण्यात आली,” असा दावा करत त्यांनी निधी वाटपाबाबतही प्रश्न उपस्थित केले. तथापि, या आरोपांबाबत कोणतेही पुरावे त्यांनी सार्वजनिकरित्या सादर केले नाहीत.

हेही वाचा: श्रद्धेच्या आड सुरू होता शोषणाचा खेळ; पुण्यातील आश्रमात नेमकं काय घडत होतं?

किरण पावसकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया

किरण पावसकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना राऊत म्हणाले, “शिंदे यांचे राजकीय पालनपोषण मातोश्रीत झाले. आज आम्हाला शिकवण्याचा प्रयत्न केला जात आहे.” तसेच त्यांनी शिंदे गटावर टीका करत “मिंधे गटात गेल्यानंतर खोटे बोलण्याची गोळी दिली जाते,” अशी टीकाही केली. (Sanjay Raut Statement)

अर्धापूर

अर्धापूर येथे शिंदे गटाच्या नेत्यांच्या वाहनांना शिवसैनिकांनी अडवल्याच्या घटनेवर बोलताना राऊत यांनी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त लावण्यात आल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. “आम्ही काय बॉम्ब टाकणार होतो का?” असा सवाल त्यांनी केला.

सहा खासदारांचा पक्षप्रवेशा नेमकं काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी सहा खासदारांचा पक्षप्रवेश कायदेशीर असल्याचे म्हटल्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी दहाव्या अनुसूचीचा उल्लेख करत पक्षफोडीला मान्यता नसल्याचा दावा केला. “कायदेशीर पक्षप्रवेशाचा प्रश्नच उद्भवत नाही,” असे ते म्हणाले. (LS Marathi News Channel)

यावेळी त्यांनी बंधू जाधव यांनाही थेट आव्हान दिले. राजकीय मतभेद असले तरी धमकावण्याची भाषा स्वीकारली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. राऊत यांच्या या वक्तव्यांमुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts