• Home
  • ताज्या बातम्या
  • ठाकरे गटात पुन्हा खळबळ! 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा; ‘ऑपरेशन टायगर 3’ची शक्यता
राजकारण

ठाकरे गटात पुन्हा खळबळ! 14 आमदार शिंदेंच्या संपर्कात असल्याची चर्चा; ‘ऑपरेशन टायगर 3’ची शक्यता

Operation Tiger 3

Operation Tiger :

Operation Tiger 3: महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडींची चर्चा रंगू लागली आहे. शिवसेना (ठाकरे गट) मधील काही आमदार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात असल्याच्या चर्चाना वेग आला आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) Thackeray Group गटातील ६ खासदारांनी २२ जून रोजी पक्ष सोडून शिवसेना (एकनाथ शिंदे) Eknath Shinde गटात प्रवेश केला. या धक्क्यातून उद्धव ठाकरे सावरत असतानाच आता ठाकरे गटातील आणखी १४ आमदार शिंदे गटात जाण्याच्या चर्चांनी राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे.

हेही वाचा: आज २६ जून! चंद्र तूळ राशीतून वृश्चिक राशीत प्रवेश करणार; कोणाला मिळणार भाग्याचा मोठा फायदा?

मिळालेल्या माहितीनुसार, ठाकरे गटातील तब्बल 14 आमदारांनी अलीकडेच शिंदे यांची गुप्तपणे भेट घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मात्र, या बैठकीबाबत कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.

याआधी ठाकरे गटातील परभणीचे संजय जाधव, मुंबई ईशान्यचे संजय दिना पाटील, यवतमाळ-वाशिमचे संजय देशमुख, हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर, धाराशिवचे ओमराजे निंबाळकर आणि शिर्डीचे भाऊसाहेब वाकचौरे या सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. या घडामोडीनंतर ठाकरे गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे मानले गेले.

Operation Tiger :

ऑपरेशन टायगर 3 ची तयारी

राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, शिंदे गटाकडून ‘ऑपरेशन टायगर 3’च्या चर्चांना वेग आला आहे. या मोहिमेअंतर्गत ठाकरे गटातील आणखी १४ आमदारांशी संपर्क साधला जात असल्याचा दावा केला जात आहे. तथापि, या दाव्यांबाबत शिंदे गट किंवा ठाकरे गटाकडून अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही. (LS Marathi News Channel)

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून ठाकरे गटातील काही आमदार नाराज असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर या कथित बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. आगामी काळात या चर्चांमधून प्रत्यक्ष राजकीय घडामोडी घडतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सध्या तरी या संपूर्ण प्रकरणाबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नसून, सर्व संबंधित पक्षांच्या भूमिकेकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष आहे. पुढील काही दिवसांत या चर्चांवर अधिक स्पष्टता येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Youtube : youtube.com/channel/UC5tZ7UVY_IuOv88_eQSVMdg

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts