Breaking News :
  • Home
  • देश
  • हाँगकाँग अग्निकांड: आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू, 8 जणांना अटक; सरकारकडून पीडितांना आर्थिक मदत
देश

हाँगकाँग अग्निकांड: आतापर्यंत 128 जणांचा मृत्यू, 8 जणांना अटक; सरकारकडून पीडितांना आर्थिक मदत

Smoke rising from high-rise buildings in Hong Kong after a massive fire with rescue teams at the scene

Hong Kong fire tragedy : हाँगकाँगमधील ताई पो येथील वांग फुक कोर्टात लागलेली भीषण आग ही एक मोठी दुर्घटना बनली आहे. या भीषण घटनेत 128 जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे, तर 200 हून अधिक जण बेपत्ता आहेत. तीन दिवसांपासून हे बचाव आणि शोध मोहीम स्थगित करण्यात आली आहे. पोलिसांनी आगीच्या कारणाचा सखोल तपास सुरु केला आहे आणि त्यासंदर्भात आठ जणांना अटक केली आहे.

128 मृत्यू आणि बचाव मोहीम थांबवली:

हाँगकाँग विशेष प्रशासकीय क्षेत्र (HKSAR) सरकारचे सुरक्षा सचिव ख्रिस तांग पिंग-केउंग यांनी पुष्टी केली की सात उंच इमारतींचा समूह असलेल्या वांग फुक कोर्ट कॉम्प्लेक्समध्ये लागलेल्या आगीत मृतांची संख्या 128 वर पोहोचली आहे. सलग तिसऱ्या दिवशी, अग्निशमन, बचाव आणि शोध मोहीम शुक्रवारी स्थानिक वेळेनुसार सकाळी 10:00 वाजता पूर्ण आणि स्थगित करण्यात आली. पोलीस तपासादरम्यान घटनास्थळावरुन आणखी मृतदेह सापडण्याची शक्यता असल्यानं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे, अशी भीती तांग यांनी व्यक्त केली.

8 जणांना अटक:

हाँगकाँग पोलिसांनी या मोठ्या आगीच्या कारणाचा तपास सुरु केला आहे. प्राथमिक अहवालांनुसार, आग प्रथम वांग चेओंग हाऊसच्या पायथ्याशी असलेल्या जाळ्यात लागली, ज्यामुळं फोम बोर्ड पेटले आणि ते इतर इमारतींमध्ये वेगानं पसरलं. वाचलेल्या रहिवाशांनी तक्रार केली की अग्निशमन अलार्म काम करत नव्हतं, त्यांना पूर्वसूचना न देता सोडलं. इमारतीच्या नूतनीकरणाच्या कामात सहभागी असलेल्या एका महिलेसह आठ जणांना हाँगकाँगच्या भ्रष्टाचार विरोधी संस्थेनं अटक केली आहे. तांगच्या मते, पुरावे गोळा करणं आणि संपूर्ण तपासासाठी अंदाजे तीन ते चार आठवडे लागण्याची अपेक्षा आहे.

 

मोठ्या प्रमाणात बचाव कार्य :

तीन दिवस चाललेल्या या मोठ्या बचाव कार्यात एकूण 391 अग्निशमन इंजिन आणि 185 रुग्णवाहिका तैनात करण्यात आल्या होत्या, ज्यामध्ये 2311 अग्निशमन आणि रुग्णवाहिका कर्मचारी काम करत होते. दुर्दैवानं, यात एका अग्निशमन दलाचा मृत्यू झाला आणि 12 जण जखमी झाले. दुर्घटनेत पूर्णपणे नष्ट झालेल्या इमारतींमधून वाचलेल्या रहिवाशांना तात्पुरते जवळच्या 1000 रिकाम्या फ्लॅटमध्ये स्थलांतरित करण्यात आलं आहे.

हे ही वाचा : वडील जिवंत असल्याचा पुरावा द्या’, इम्रान खान यांच्या मृत्यूच्या अफवांदरम्यान मुलाची सोशल मीडिया पोस्ट

सरकारकडून पीडितांना आर्थिक मदत :

हाँगकाँग सरकारनं पीडितांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. मृतांच्या प्रत्येक कुटुंबाला 200,000 हाँगकाँग डॉलर्सचं अनुदान मिळेल. याव्यतिरिक्त, पुढील आठवड्यापासून प्रत्येक कुटुंबाला 50,000 हाँगकाँग डॉलर्सचा राहणीमान भत्ता मिळेल. सरकारनं बाधित कुटुंबांच्या तात्काळ गरजा पूर्ण करण्यासाठी 10,000 हाँगकाँग डॉलर्सचं आपत्कालीन रोख अनुदान देखील सुरु केलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts