Bihar New CM | आज (14 एप्रिल) नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मुख्यमंत्री म्हणून आपली शेवटची मंत्रिमंडळ बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केली. नितीश यांच्या राजीनाम्यानंतर बिहारचा नवा मुख्यमंत्री (Bihar Nes CM) कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर आता बिहारचा मुख्यमंत्री भाजपचा होणार असून नव्या मुख्यमंत्र्याची निवड देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा – आशा भोसलेंच्या निधनानंतर पाकिस्तानामध्ये मोठा वाद, ‘जिओ न्यूज’ला पाठवली थेट नोटीस, नेमकं प्रकरण काय?
बिहारचा नवा मुख्यमंत्री कोण होणार?
नितीश कुमार यांनी राजीनामा दिल्यानंतर सम्राट चौधरी (Samrat Chaudhary) यांची बिहारच्या मुख्यमंत्रीपदी निवड करण्यात आली आहे. सम्राट चौधरी हे भाजपचे मोठे नेते असून त्यांचं नाव आता मुख्यमंत्रीपदासाठी निश्चित झालं आहे. सोबतच नितीश कुमार यांचे सुपूत्र निशांत कुमार (Nishant Kumar) हे बिहारचे उपमुख्यमंत्री होऊ शकतात, अशा शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारचा नवे मुख्यमंत्री भाजपचे सम्राट चौधरी हे होणार असून ते उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. उद्या (15 एप्रिल) सकाळी 11 वाजता शपधविधी सोहळा पार पडणार असून सम्राट चौधरी हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. तसेच उपमुख्यमंत्री देखील या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणार आहेत. तर या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर राष्ट्रीय स्तरावरील नेते उपस्थित राहणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बिहारच्या नव्या सरकारमध्ये भाजपमधील काही नवीन चेहरे मंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आपल्या कोट्यातील काही अकार्यक्षम मंत्र्यांना हटवून त्यांच्या जागी नवीन चेहऱ्यांना स्थान देऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे. मात्र, हे नवीन चेहरे कोण असतील, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राजीनाम्याची घोषणा करताना नितीश कुमार भावूक
दरम्यान, 20 वर्षे बिहारवर राज्य करणारे नितीश कुमार यांचा कार्यकाळ आज संपत आहे. त्यांनी आपल्या शेवटच्या मंत्रिमंडळ बैठकीत राजीनाम्याची घोषणा केली. बैठकीदरम्यान ते म्हणाले की, “मी आता जात आहे, पण माझे मार्गदर्शन सुरूच राहील.” आपल्या पाच मिनिटांच्या भाषणात नितीश कुमार भावूक झाले आणि म्हणाले, “मी 2005 मध्ये सत्तेवर आलो, माझ्याकडून जे काही शक्य होते ते मी केले आणि नवीन सरकारला माझे मार्गदर्शन मिळत राहील”, असं नितीश कुमार म्हणाले. तर मिळालेल्या माहितीनुसार नितीश कुमार हे लवकरच राज्यपालांना भेटून आपला राजीनामा सादर करणार आहेत.












