Bachchu Kadu on BJP Betrayal : प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी नुकताच शिंदे गटात प्रवेश केलाय. शिंदे गट सध्या महायुती म्हणून भाजपसोबत सत्तेमध्ये आहे. असे असताना आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या एक विधानाने राज्याच्या राजकीय वर्तूळात खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे त्यांनी आपला राजकीय मित्रपक्ष असलेल्या भाजपवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच एकप्रकारे अविश्वास दाखवत महायुतीमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याचा मेसेजच दिलाय.
दरम्यान, बच्चू कडू यांनी शिंदे गटात प्रवेश करून एका बाजूला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं गुणगान गात असताना, दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपला लक्ष्य करत निशाणा साधला आहे. आमच्या मनातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. पुढील काळात शिंदे यांनीच मुख्यमंत्री व्हावेत, अशी इच्छाही कडू यांनी व्यक्त केलीय. २०२९ मध्ये त्यांना मुख्यमंत्री करायचं आहे, त्यासाठी आम्ही राज्य पिंजून काढू, असंही बच्चू कडू म्हणाले.
आमच्या मनातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हेच आहेत – कडू
दरम्यान, माध्यमांशी बोलताना त्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे अनेकांचा भुवया उंचावल्या असून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी प्रत्येक शिवसैनिकाच्या मनातील इच्छा आहे. आमच्या मनातली मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच हेच आहेत. २०२९ च्या निवडणुकीत मोठा विजय मिळवून बच्चू कडूंना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायचं आहे. त्यासाठी आम्ही संपूर्ण राज्य पिंजून काढू असं कडू म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशाच्या सर्वोच्च पदी जावं, देवा भाऊंचं प्रमोशन व्हावं अशी इच्छाही कडू यांनी यावेळी व्यक्त केली. पुढे उद्धव ठाकरेंच्या नावाचा उल्लेख करत एक मोठं विधान केलंय. ‘२०१९ मध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत दगाफटका झाला. त्यामुळे पुढील काळात देखील दगा फटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भाजप स्वतंत्र लढण्याची तयारी करत आहे, तर आम्हीही तयारी करत आहोत’ असं बच्चू कडू म्हणाले.
एक मात्र नक्की, यानिमित्ताने राज्यातील महायुतीमध्ये असलेली अंतर्गत धुसफूस समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्याच जिल्ह्यातील एका कार्यक्रमातून डावलण्यात आल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन सोहळ्यानिमित्ताने नवी मुंबईत विमानतळावर शिवरायांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात आलं. मात्र त्या सोहळ्या एकनाथ शिंदे यांना निमंत्रण न दिल्याचे उघडकीस आले.
उद्घाटन कार्यक्रमात शिंदेंना डावलल्याने महायुतीत नाराजी
यामुळे उपमुख्यमंत्री शिंदे नाराज होते, अशी चर्चा होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालेल्या या उद्घाटन कार्यक्रमात शिंदेंना डावलल्याने महायुतीत नाराजी पसरल्याचे बोलले जात होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेला डावललं जात आहे का? असा सवाल बच्चू कडू यांना विचारण्यात आला, त्यावेळी त्यांनी सडेतोड उत्तर दिलं. डावलून शिवसेना थांबणार नाही, ही सेना आहे आणि सेना कधी थांबत नसते. त्यामुळे कोणीही चुकूनही डावलण्याचा प्रयत्न केला तर येणाऱ्या काळात तसे दिवस दिसल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा बच्चू कडू यांनी एकप्रकारे भाजपला दिलाय. आता यावर भाजपकडून या प्रतिक्रिया येतेय हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.












