Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना; अमृता फडणवीस काय म्हणाल्या?
Top News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस दिल्लीला रवाना; अमृता फडणवीस काय म्हणाल्या?

Devendra Fadnavis
45
Devendra Fadnavis: आज गेल्या ३५ दिवसांपासून सुरू असलेल्या CJPच्या आंदोलनाला यश मिळाल्याचा दावा केला जात आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस तातडीने दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर देशाच्या राजकीय वर्तुळात विविध चर्चा सुरू झाल्या आहेत. विद्यार्थ्या आंदोलन, शिक्षण क्षेत्रातील प्रश्न आणि विरोधकांच्या टीकेच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून काही महत्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis ) हे दिल्लीला रवाना झाल्याने राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यामागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, केंद्रीय नेतृत्वासोबतच्या बैठकीसाठी हा दौरा असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

हेही वाचा: ब्रेकिंग न्यूज! धमेंद्र प्रधानांचा राजीनामा; CJP च्या आंदोलनाला अखेर यश, पत्रात नेमकं काय लिहिलं?

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह महापूजा

Devendra Fadnavis : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह महापूजा केली होती. त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर फडणवीस यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या दिल्ली भेटीत कोणत्या विषयांवर चर्चा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

अमृता फडणवीस यांचे वक्तव्य चर्चेत

गेल्या काही काळापासून देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात महत्त्वाची जबाबदारी मिळण्याच्या चर्चांना वेग आला होता. याबाबत अमृता फडणवीस यांना विचारण्यात आले असता त्यांनी महाराष्ट्रातच राहण्याची इच्छा व्यक्त केली.

“मला महाराष्ट्रातच राहायचं आहे. मी देवेंद्रजींना महाराष्ट्रातच ठेवणार,” असे अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

दरम्यान, फडणवीस यांचा दिल्ली दौरा आणि त्यामागील कारणांबाबत अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts