• Home
  • ताज्या बातम्या
  • MH 12 बदलणार नाही! पुणे आरटीओ कोड कायम ठेवण्यासाठी मुरलीधर मोहोळांची नितीन गडकरींशी भेट
Pune

MH 12 बदलणार नाही! पुणे आरटीओ कोड कायम ठेवण्यासाठी मुरलीधर मोहोळांची नितीन गडकरींशी भेट

MH 12 RTO Code

MH 12 RTO Code: पुणेकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. वाहनांच्या नंबर प्लेटवर दिसणारा MH 12 हा आरटीओ कोड कायम राहणार असून, नवीन वाहन नोंदणी मालिकेबाबत सुरू असलेल्या चर्चांना आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.

पुण्याची ओळख बनलेला MH 12 आरटीओ कोड (MH 12 RTO Code) पुढेही कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे आरटीओमध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी सध्या MH 12 ZZ ही शेवटची मालिका सुरू असून ती संपत आल्याने पुढील पर्यायी नोंदणी मालिकेबाबत प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. त्यामुळे पुण्याचा आरटीओ कोड बदलला जाणार असल्याची चर्चा रंगली होती.

हेही वाचा: कोणतेही औषध किंवा ठोस उपचार नाहीत… गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे 22 मृत्यू, जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

मात्र, पुणेकरांच्या भावना आणि शहराची ओळख लक्षात घेऊन हा कोड कायम ठेवण्याची मागणी करण्यात आली. अनेक नागरिकांनीही MH 12 हा कोड बदलू नये, अशी भूमिका घेतली होती. (Pune RTO)

या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पुण्याची ओळख असलेला MH 12 कोड कायम ठेवण्याची विनंती केली तसेच याच कोडअंतर्गत पुढील पर्यायी वाहन नोंदणी मालिका सुरू करण्यासाठी आवश्यक निर्णय घेण्याची मागणी केली. (Vehicle Registration Rules)

या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत नितीन गडकरी यांनी MH 12 आरटीओ कोड कायम ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही दिली.

यामुळे पुणेकरांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. शहराची वेगळी ओळख बनलेला MH 12 आरटीओ कोड यापुढेही कायम राहण्याची शक्यता अधिक बळकट झाली असून, वाहनधारकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts