Breaking News :
बिजनेस

रेपो रेटचा फैसला आज! EMI कमी होणार की व्याजदर कायम राहणार?

RBI Repo Rate

RBI Repo Rate: RBI च्या पतधोरण समितीच्या बैठकीनंतर आज व्याजदरांबाबत मोठा निर्णय जाहीर होणार आहे. रेपो रेटमध्ये बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम कर्जाच्या EMI, महागाई आणि बाजारावर होऊ शकतो. मात्र तज्ज्ञांच्या मते, सध्याची आर्थिक परिस्थिती पाहता RBI व्याजदर कायम ठेवण्याची शक्यता अधिक आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये शेवटचा रेपो रेट बदलण्यात आला होता. त्यानंतर तीन पतधोरणांची घोषणा झाली असून व्याजदर जैसे थे ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळीही सलग चौथ्यांदा व्याजदरात कोणतेही बदल होण्याची शक्यता कमी आहे.

भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) मॉनेटरी पॉलिसी कमिटीची (MPC) तीन दिवशीय बैठक सोमवारी सुरू झाली. RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा 5 ऑगस्ट रोजी म्हणजेच आज बुधवारी या बैठकीतील निर्णय जाहीर करणार आहेत.

हेही वाचा: कोणतेही औषध किंवा ठोस उपचार नाहीत… गुजरातमध्ये चांदीपुरा व्हायरसमुळे 22 मृत्यू, जाणून घ्या लक्षणे आणि बचावाचे उपाय

RBI रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याची शक्यता ( RBI Repo Rate )

ब्लूमबर्गच्या सर्वेनुसार, जागतिक स्तरावरील अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर RBI रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याची शक्यता अर्थतज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. ग्राहक महागाईत अलीकडे वाढ झाली असली तरी ती RBI च्या निर्धारित मर्यादेत आहे. त्यामुळे व्याजदरात तातडीने बदल होण्याची शक्यता कमी आहे.

RBI ने चालू आर्थिक वर्षासाठी सरासरी महागाई दर 5.1 टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच महागाईच्या अंदाजात मोठा बदल होण्याची शक्यता नाही.

जूनच्या बैठकीतही रेपो रेट स्थिर

जून महिन्यात झालेल्या MPC बैठकीत RBI ने रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवला होता. 3 ते 5 जूनदरम्यान झालेल्या बैठकीत ‘न्यूट्रल’ पतधोरणाचा दृष्टिकोनही कायम ठेवण्यात आला होता.

याशिवाय स्टँडिंग डिपॉझिट फॅसिलिटी (SDF) दर 5 टक्क्यांवर, तर मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर आणि बँक रेट 5.5 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आले होते.

RBI गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी जागतिक अर्थव्यवस्थेतील अनिश्चिततेचा उल्लेख करताना पश्चिम आशियातील संघर्ष, पुरवठा साखळीतील अडथळे आणि बाजारातील चढ-उतार यामुळे परिस्थिती आव्हानात्मक असल्याचे सांगितले होते.

RBI MPC बैठकीची तारीख आणि वेळ

RBI ची द्वैमासिक MPC बैठक 3 ऑगस्ट ते 5 ऑगस्टदरम्यान पार पडत आहे. RBI बुधवारी सकाळी 10 वाजता पतधोरणाचा निर्णय जाहीर करेल. त्यानंतर दुपारी 12 वाजता RBI गव्हर्नर पत्रकार परिषद घेऊन माहिती देतील.

रेपो रेटमध्ये बदल होणार का?

INVasset PMS चे बिझनेस प्रमुख हर्षल दसानी यांच्या मते, RBI रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवण्याची शक्यता आहे. आता बाजाराचे लक्ष केवळ व्याजदराच्या निर्णयावर नसून महागाई आणि बाजारातील तरलतेबाबत RBI काय भूमिका मांडते याकडे असेल.

महागाईचा दर RBI च्या मध्यमकालीन उद्दिष्टापेक्षा थोडा जास्त असला तरी कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती आणि जागतिक जोखमी असूनही आर्थिक विकास मजबूत आहे. त्यामुळे पतधोरणात अचानक बदल करण्याची गरज नसल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

RBI चा दृष्टिकोन ‘न्यूट्रल’ राहण्याची शक्यता

SMC ग्लोबल सिक्युरिटीजच्या वरिष्ठ संशोधन विश्लेषक सीमा श्रीवास्तव यांच्या मते, RBI आगामी बैठकीत रेपो रेट 5.25 टक्क्यांवर कायम ठेवू शकते आणि ‘न्यूट्रल’ धोरण कायम ठेवण्याची शक्यता आहे.

RBI कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी आगामी आर्थिक आकडेवारीचा आढावा घेईल. महागाईचा दबाव वाढल्यास भविष्यात व्याजदर वाढण्याची शक्यता वाढू शकते. मात्र महागाई कमी झाली आणि आर्थिक विकास स्थिर राहिला, तर RBI सध्याची व्याजदर स्थिर ठेवण्याची भूमिका कायम ठेवू शकते.

त्यामुळे आजच्या RBI च्या निर्णयाकडे कर्जदार, गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts