• Home
  • Top News
  • नसरापूरनंतर भंडाऱ्यात संतापजनक घटना! तीन वर्षीय मुलीवरील अत्याचार; न्यायासाठी शहर एकवटले
गुन्हा

नसरापूरनंतर भंडाऱ्यात संतापजनक घटना! तीन वर्षीय मुलीवरील अत्याचार; न्यायासाठी शहर एकवटले

Bhandara Crime

Bhandara Crime: नसरापूर प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच भंडारा शहरात तीन वर्षीय चिमुकलीवरील कथित लैंगिक अत्याचाराच्या घटनेने संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणातील आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी करत नागरिक रस्त्यावर उतरले असून न्यायासाठी शहर एकवटले आहे.

भंडारा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वार्डात गुरुवारी सकाळी ११ च्या सुमारास तीन वर्षीय मुलीवर लैंगिक (Child Assault Case) अत्याचाराच्या घटनेनंतर संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनेच्या निषेधार्थ आज शुक्रवारी ‘भंडारा बंद’चे आवाहन करण्यात आले असून नागरिकांनी आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हेही वाचा: 29 टीएमसी क्षमता, 43 टीएमसी आवक! जुलैत खडकवासला धरण साखळीने रचला जलविक्रम

चिमुकलीला आमिष दाखवून नेल्याचा आरोप ( Bhandara Crime )

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, 30 वर्षीय तरुणाने चिमुरडीला आमिष दाखवून सार्वजनिक शौचालयात नेल्याचा आरोप आहे. चिमुरडीच्या आरडाओरडीनंतर परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. या गोंधळात तरुण जखमी झाला असून त्याच्यावर वैद्यकीय उपचार करण्यात आले.

रुग्णालय परिसरात तणाव

घटनेनंतर पीडित मुलीला आणि आरोपी या दोघांना उपचारासाठी भंडारा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच मोठ्या संख्येने नागरिक रुग्णालय परिसरात जमले. आरोपीवर तातडीने कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी नागरिकांनी आंदोलन केले. त्यामुळे परिसरात काही तास तणावाचे वातावरण निर्माण झाले.

अतिरिक्त पोलीस बंदोबस्त

परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्हा पोलीस प्रशासनाने शहरात आणि रुग्णालय परिसरात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात केला. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नागरिकांशी चर्चा करून कायद्यानुसार कठोर कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर वातावरण शांत झाले.

फास्टट्रॅक न्यायालयात खटला चालवण्याची मागणी

या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक न्यायालयात चालवण्यात यावा आणि पीडितेला तातडीने न्याय मिळावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भंडारा शहरातील अनेक व्यापारी प्रतिष्ठाने बंद ठेवण्यात आली असून शहरात बंदला प्रतिसाद मिळत आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts