• Home
  • महाराष्ट्र
  • मराठी तरुणाला गुजरात्याने कपडे काढून मारलं मुंबईत काय दिवस आले!
Mumbai

मराठी तरुणाला गुजरात्याने कपडे काढून मारलं मुंबईत काय दिवस आले!

Mumbai Marathi youth assault

Mumbai Marathi youth assault : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून मराठी भाषेवरून वाद पाहायला मिळत आहे…आता याच भाषेच्या वादावरून एका गुजरात्याने मराठी तरूणाला विवस्त्र करून अमानुष मारहाण केली आहे..यामुळे आता मुंबईत पुन्हा एकदा वातावरण तापले आहे…ही घटना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या प्रभागात घडली आहे…म्हणजे मुंबईच्या महापौरच्या प्रभागात एका मराठी तरुणावर अमानुष अत्याचार केला जात आहे…याच मुंबईसाठी 106 हुतात्म्यांनी बलिदान दिले आहे…मुंबई ही मराठी माणसाची आहे…मात्र आता खरंच मुंबई मराठी माणसांची आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय…कारण गेल्या काही दिवसांपासून मुंबईत मराठी माणसांवर वारंवार हल्ले होताना दिसत आहे..काही ठिकाणी तर मराठी माणसांना आता घरही दिले जात नाही…मुंबईत मराठी माणसांना नोकरी दिली जात नसल्याच्या काही तक्रारी देखील समोर आल्या होत्या…फक्त गुजरात्यांचे आणि परप्रांतीयांचे मतं हवी असल्याने या घटनांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे का? असा प्रश्न निर्माण झालाय…घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं? गुजरात्यांची एवढी हिंमत कुणामुळे वाढली आहे? राज्य सरकार या गुजरात्यांवर कारवाई का करत नाही?

घाटकोपरमध्ये नेमकं काय घडलं? ( Mumbai Marathi youth assault )

मुंबईच्या घाटकोपर पूर्व परिसरातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीमध्ये हाऊसिंग व्हॅल्युएशनसाठी 32 वर्षीय मराठी तरूण गेला होता…केवळ भाषेच्या कारणावरून विवस्त्र करून एका गुजरात्याने अमानुष मारहाण केल्याची माहिती आहे… आरोपी फ्लॅट मालकाने पीडित तरुणाला घरात डांबून ठेवत सुमारे दीड तास त्याचा छळ केला.. त्याचा मोबाईल 13 व्या मजल्यावरून खाली फेकून दिला आणि विवस्त्र करून त्याचा व्हिडिओ देखील रेकॉर्ड केला.. याप्रकरणी पंतनगर पोलिसांनी माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली… आणि फ्लॅट मालक धवल शाहला अटक केली आहे. या घटनेमुळे मुंबईतील मूळ भूमिपुत्र आणि गुजराती भाषिक यांच्यात गेल्या काही काळापासून सुरू असलेला भाषिक संघर्ष पुन्हा एकदा अत्यंत तीव्रतेने उफाळून आला आहे…

पोलिसांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार, पीडित 32 वर्षीय प्रवीण मिस्त्री हा वाशी येथील एका फायनान्स कंपनीत हाऊसिंग व्हॅल्युएशन ऑफिसर म्हणून कार्यरत आहे.. बँकेच्या गृहकर्ज प्रक्रियेचा भाग म्हणून घाटकोपर पूर्व येथील आर. बी. मेहता मार्गावर असलेल्या प्रसिद्ध ‘दीपक बिल्डिंग’मधील 13 व्या मजल्यावरील एका फ्लॅटचे मूल्यमापन करण्यासाठी प्रवीण गेला होता.. त्याने फ्लॅटचा दरवाजा ठोठावला आणि आत प्रवेश केला.. तिथे घरमालक 45 वर्षीय धवल शाह (Dhaval Shah ) हजर होता. सुरुवातीला कामाची माहिती देताना प्रवीणने मराठी आणि हिंदी मिश्रित भाषेत संवाद साधण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे…. मात्र, प्रवीणने मराठीत संवाद साधताच धवल शाहचा पारा चढला. त्याने प्रवीणच्या भाषिक अस्मितेवर अत्यंत आक्षेपार्ह आणि अपमानकारक विधाने करण्यास सुरुवात केली.. “मुंबईत राहायचे असेल तर आमच्या पद्धतीने वागावे लागेल,” असे म्हणत त्यांच्यात जोरदार शाब्दिक वाद झाल्याची माहिती आहे…

हा वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपी धवल शाहाने प्रवीणला बळजबरीने घराच्या आत ओढले आणि दरवाजा बंद केला… स्वतःचा जीव धोक्यात असल्याचे पाहून प्रवीणने आपल्या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या प्रकाराची माहिती देण्यासाठी खिशातून मोबाईल काढण्याचा प्रयत्न केला.. मात्र, नराधम धवल शाहने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला आणि कोणतीही भीती न बाळगता तो थेट १३ व्या मजल्यावरील गॅलरीतून खाली फेकून दिला, जेणेकरून प्रवीणला कोणाशीही संपर्क साधता येऊ नये..

मोबाईल फेकून दिल्यानंतर आरोपीच्या डोक्यातील विकृती अधिकच वाढली… त्याने प्रवीणला एका खोलीत कोंडले आणि त्याचे सर्व कपडे बळजबरीने ओरबाडून काढले… प्रवीणला पूर्णपणे विवस्त्र केल्यानंतर आरोपीने त्याला लाथाबुक्क्यांनी, बेल्टने बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली… अमानुषतेची सीमा ओलांडत धवल शाहने विवस्त्र अवस्थेत असलेल्या आणि जीव वाचण्यासाठी विनवणी कणाऱ्या प्रवीणचा स्वतःच्या मोबाईलवर व्हिडिओ शूट केला. “हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकून तुला समाजात तोंड दाखवायला जागा ठेवणार नाही,” अशी धमकी देत त्याने प्रवीणचे मानसिक खच्चीकरण केले… आरोपीने प्रवीणचे कपडे घराबाहेर पॅसेजमध्ये फेकून दीड तास प्रवीणचा छळ करत राहिला…

हेही वाचा : नाशिकच्या प्रश्नांवर राज ठाकरेंचा ‘राज’कीय प्रहार; कुंभमेळ्यापासून शिक्षण व्यवस्थेपर्यंत सरकारला घेरले

मराठी तरुणावर कथित अत्याचाराचा आरोप काय आहे?

सुदैवाने, प्रवीण इमारतीमध्ये जात असताना त्याचा एक सहकारी मित्र इमारतीच्या खालीच उभा राहून त्याची वाट पाहत होता.. तब्बल एक-दीड तास उलटूनही प्रवीण खाली आला नाही आणि त्याचा मोबाईल फोनही अचानक ‘नॉट रिचेबल’ दाखवू लागल्यामुळे त्या मित्राला काहीतरी विपरीत घडल्याचा संशय आला.. त्याने क्षणाचाही विलंब न लावता त्याने थेट 100 नंबर डायल करत मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला फोन करून दीपक बिल्डिंगमध्ये काहीतरी गंभीर प्रकार घडत असल्याची माहिती दिली… नियंत्रण कक्षाकडून संदेश मिळताच पंतनगर पोलीस ठाण्याचे पथक तातडीने सायरन वाजवत घटनास्थळी दाखल झाले… पोलिसांनी १३ व्या मजल्यावरील संबंधित फ्लॅटचा दरवाजा ठोठावून आत प्रवेश केला आणि अत्यंत गंभीर, जखमी अवस्थेत असलेल्या प्रवीण मिस्त्री यांची धवल शाहच्या तावडीतून सुटका केली… पोलिसांनी पीडित तरुणाला तात्काळ रुग्णालयात नेऊन त्याच्यावर वैद्यकीय उपचार केले आणि त्याच्या जबाबावरून फ्लॅट मालक धवल शाहविरुद्ध बेकायदेशीरपणे डांबून ठेवणे, विवस्त्र करून व्हिडिओ बनवणे, अमानुष मारहाण करणे आणि पुरावे नष्ट करणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या…

घाटकोपरमधील या घटनेने केवळ एका गुन्हेगाराची विकृत मानसिकता समोर आणलेली नाही, तर मुंबईत गेल्या काही वर्षांपासून सातत्याने वाढत असलेल्या मराठी विरुद्ध गुजराती भाषिक वादाला पुन्हा एकदा हवा दिली आहे… मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि मराठी माणसाच्या अस्मितेचे केंद्र असूनही, येथील आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या गुजराती आणि मारवाडी बहुल भागांमध्ये मराठी माणसाला दुय्यम वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारी सातत्याने वाढत आहेत… यापूर्वी एप्रिल २०२६ मध्ये याच घाटकोपर ( Ghatkopar ) परिसरात सार्वजनिक शौचालय वापरण्याच्या किरकोळ कारणावरून एका गुजराती व्यापाऱ्याने मराठी व्यापाऱ्याला आणि त्याच्या कामगारांना रस्त्यावर बेदम मारहाण केली होती. तसेच २०२५ मध्ये घाटकोपरमधील नालंदा सोसायटीत एका मराठी कुटुंबाला केवळ ते मांसाहारी आहेत या कारणावरून घर भाड्याने देण्यास नकार देण्यात आला होता आणि “तुम मराठी लोग गंदा खाना खाते हो,” असे म्हणून त्यांचा अपमान करण्यात आला होता… या सर्व घटनांमुळे स्थानिक मराठी जनतेमध्ये आधीच तीव्र संताप आहे…

हेही वाचा : शिवसेना पक्ष-चिन्ह वादात सर्वोच्च न्यायालयात जोरदार युक्तिवाद; कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगालाच घेरलं

धवल शाहविरोधात कोणते गुन्हे दाखल झाले? ( Dhaval Shah )

त्यातच आता थेट शासकीय किंवा निमशासकीय कामासाठी गेलेल्या मराठी अधिकाऱ्यावर एका परप्रांतीय घरमालकाने घरात डांबून विवस्त्र करण्याचे धाडस केल्यामुळे मुंबईतील राजकीय आणि सामाजिक वातावरण कमालीचे तापण्याची शक्यता आहे…मनसे आणि ठाकरे गटाकडून या घरमालकाला चांगलाच धडा शिकवण्याची शक्यता आहे.. सोशल मीडियावर “मुंबईत मराठी माणूस सुरक्षित नाही का?” असा सवाल करत नेटकऱ्यांनी आरोपी धवल शाहवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची मागणी लावून धरली आहे…

मुंबई ही मराठी माणसाची आहे, असं आपण जरी आज म्हणत असलो तरी खरंच मुंबई मराठी माणसाची आहे का? असा प्रश्न आता निर्माण झालाय…मराठी माणूस मुंबईतून बाहेर फेकला गेला आहे..मुंबईत मोठंमोठी घरं, दुकानं गुजराती लोकांच्या आहेत..या ठिकाणी मराठी माणूस फक्त भाडेकरू म्हणून शिल्लक राहिला आहे…आज 2026 मध्ये गुजराती लोक मराठी माणसांवर एवढी दादागिरी करत आहे, तर पुढील 5 वर्षात मुंबईत काय परिस्थिती राहिल असा प्रश्न निर्माण झालाय…मुंबईत गुजराती आणि उत्तर भारतीय लोक मोठ्या प्रमाणात आहे…त्यांचे मतदान आपल्याकडे वळण्यासाठी सत्ताधारी त्यांच्यावर कठोर कारवाई करत नसल्याचा आरोप आहे…जर वेळीच राज्य सरकारने या घटना रोखल्या नाही, तर आगामी काळात मराठी माणूस उरणारच नाही, असं म्हटलं जात आहे…तुम्हाला काय वाटतं सरकार या गुजरात्यांवर का कारवाई करत नाही?

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts