Top News

वाघोलीतील बकोरी रोड परिसरात दोन गटांत हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Clash between two groups in Wagholi

Clash between two groups in Wagholi : वाघोली येथील बकोरी रोड परिसरात असलेल्या शाळा व कॉलेज परिसरात दोन गटांमध्ये (Two student clashes) फ्री स्टाईल हाणामारी (Free style brawl) झाल्याची घटना घडली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल (Video goes viral on social media) होत असून, नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये एका हॉटेलजवळ एका तरुणाना अनेक तरुण मिळून लाथा-बुक्क्यांनी मारहाण करताना स्पष्टपणे दिसत आहे.

हेही वाचा – सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक करून चोरी करणारी टोळी जेरबंद; १२ गुन्हे उघडकीस

या हिंसक मारहाणीमुळे वाघोली परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत. या हाणामारीच्या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर सध्या व्हायरल होत आहे. या भागात सतत होणाऱ्या वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाकडे कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ

गेल्या काही दिवसांपासून वाघोली परिसरातील शाळा व कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन गटांमध्ये हाणामारीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वाढत्या घटनांकडे पुणे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

दारू पिऊन धिंगाणा, परिसरातील महिलांना त्रास

वाघोली मध्ये बकोरी रोड परिसरात गुन्हेगारी वाढत आहे. न्याती कमर्शियल कॉम्प्लेक्स मध्ये बियर दुकानात अनेक तरुण दारू पिऊन धिंगाणा करत असून याचा परिसरातील महिलांना त्रास होत आहे. वाघोली पोलिसांनी याची दाखल घेऊन या तरुणांना धडा शिकवला पाहिजे अशी मागणी माहिती सेवा समितीचे अध्यक्ष चंद्रकांत गोविंद वारघडे यांनी केली आहे. आता वाघोली पोलीस काय कारवाई करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts