Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ‘परीक्षा पे चर्चा’! पंतप्रधान मोदींनी १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना दिला परीक्षेचा कानमंत्र..
Top News

‘परीक्षा पे चर्चा’! पंतप्रधान मोदींनी १०वी, १२वीच्या विद्यार्थ्यांना दिला परीक्षेचा कानमंत्र..

Advice for 10th and 12th grade students
65

Advice for 10th and 12th grade students : दरवर्षीप्रमाणे यंदाही देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज देशातील विद्यार्थ्यांशी ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमातून देशातील कोट्यावधी विद्यार्थी संवाद साधला. परीक्षा उत्सवाप्रमाणे साजरी करा. इतरांशी नाही तर स्वतःशी स्पर्धा करा. तंत्रज्ञानाचा योग्य वापर करा. कठीण कामे प्रथम करा. पोपट नव्हे तर परीक्षा योद्धा बना, असा कानमंत्र मोंदीनी १०वी, १२ वीच्या परीक्षेला समोरे जाणाऱ्या विद्यार्थ्यांना कानमंत्र (Advice for 10th and 12th grade students) दिला. ‘परीक्षा पे चर्चा २०२६’ (Exam Pay Discussion 2026) या कार्यक्रमाने मागील सर्व विक्रम मोडले आहेत. २०२६ मध्ये या कार्यक्रमासाठी सुमारे ६ कोटी ७६ लाख विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांनी नोंदणी केली होती. ज्यात अंदाजे ४ कोटी ५० लाख एवढा मोठी विद्यार्थ्यांची संख्या आहे. हा आकडा २०२५ मध्ये नोंदवलेल्या ३ कोटी ५३ लाख गिनीज वर्ल्ड रेकॉर्डला (Guinness World Records) मागे टाकणारा ठरला आहे.

यावेळी देशातील विविध भागातील विद्यार्थ्यांशी पंतप्रधान मोदी यांनी चर्चा केली. त्यांनी गुजरातच्या देवमोगरा, तामिळनाडूच्या कोयंबटूर, छत्तीसगडच्या रायपूर, आसामाच्या गुवाहाटी, दिल्लीतील सात कल्याण मार्ग येथील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारण्यात आलेल्या प्रश्नावर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, या स्थितीत अधिक लक्ष १२ वीच्या परीक्षेकडे द्यायला हवे. जर तुम्ही १२ वीची चांगली तयारी केली असेल तर त्याचा पुढेही फायदा मिळेल. आई वडिलांना वाटते, वयाच्या आधीच सर्व काही मिळावे, परंतु मुलांना खेळण्यासाठीही वेळ दिला पाहिजे असं त्यांनी सांगितले.

वाचन करतो पण विसरतो

मुलांच्या या प्रश्नावरही पंतप्रधानांनी भाष्य केले. जसं तुम्हाला आजचा दिवस कायम लक्षात राहील, कारण तुमचा सहभाग यात आहे. तुम्ही कधीही स्वतःला कमी हुशार आहे असं सांगून जो जास्त हुशार आहे त्याच्याशी संवाद साधा, त्यांची मते जाणून घ्या. मार्क्स एक आजार बनला आहे. टॉपर्सची नावेही लक्षात ठेवता येत नाहीत. त्याचा अर्थ हे सर्व काही वेळेपुरतेच असते. त्यासाठी आपल्या मनात नंबर, मार्क्स याचा विचार न करता आपले जीवन कसे पुढे जाईल, त्यासाठी मेहनत करायला हवी. जसं एखादा खेळाडू आपले लक्ष्य मिळवण्यासाठी संपूर्ण शरीराची काळजी घेतो. तसेच आपलं आयुष्य परीक्षेसाठी नाही तर आपले जीवन सुधारण्यासाठी शिक्षण एक माध्यम आहे. परीक्षा स्वतःला सिद्ध करण्यासाठी असते, परीक्षेतील नंबर हे लक्ष्य नाही. जीवनाचा विकास हे लक्ष्य ठेवा असं त्यांनी सांगितले.

कौशल्य गरजेचे आहे की परीक्षेतील नंबर?

प्रत्येक गोष्टीत समतोल असणे गरजेचे आहे. एकीकडे झुकाल तर पडाल. त्यामुळे एकाबाजूला वाकू नका. कौशल्य २ प्रकारचे असते. ज्यात एक लाइफ स्किल आणि प्रोफेशनल स्किल आहे. त्यामुळे दोन्ही स्कीलवर लक्ष द्यायला हवे. स्किलची सुरुवात ज्ञानाने होते. त्यासोबत लाइफ स्किलवरही ध्यान ठेवा. ज्यात झोपेतून उठण्याची वेळ, व्यायाम करणे यावर लक्ष द्या. प्रत्येक स्किलमध्ये सुधारणा करत राहायला हवी असा सल्ला पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना दिला.

शिक्षकांनाही दिला सल्ला

अनेकदा टीचरचे स्पीड आमच्यापेक्षा जास्त असते आणि आम्ही मागे राहतो, अशावेळी आम्ही काय करायचे असं एकाने मोदींना विचारले. त्यावर मोदींनी शिक्षकांनाही सल्ला दिला. प्रत्येक शिक्षकाचा हा प्रयत्न राहिला पाहिजे की त्यांचे विद्यार्थी कायम एक पाऊल पुढे राहिले पाहिजे. मुलांनी केवळ एक पाऊल पुढे असायला हवे, जर अंतर जास्त असेल तेही समस्येचे ठरेल. शिक्षकांनी ते पुढच्या आठवड्यात काय शिकवणार ते मुलांना आधीच सांगितले पाहिजे. त्यातून मुले आधीपासून त्याची तयारी करतील. जेव्हा मुलांना आधीच कल्पना असेल तेव्हा त्यांना शिकण्यात आणखी रस वाढेल असं मोदींनी म्हटलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts