Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार; जुहू परिसरात खळबळ
Top News

दिग्दर्शक रोहित शेट्टींच्या घराबाहेर गोळीबार; जुहू परिसरात खळबळ

Rohit Shetty House Firing Incident

Rohit Shetty House Firing Incident : बॉलीवूडचे प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील निवासस्थानाबाहेर रात्री उशिरा अज्ञातांकडून चार राऊंड गोळीबार करण्यात आला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी रोहित शेट्टींच्या घराबाहेरील सुरक्षा वाढवली आहे.

हेही वाचा – शिक्षण क्षेत्राला ‘ग्लोबल टॅलेंट हब’ बनवण्यासाठी अर्थसंकल्पात तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांवर भर

मध्यरात्रीच्या सुमारास रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर चार गोळ्या झाडल्याचा आवाज स्थानिकांनी ऐकला. सुदैवाने, या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही. घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा आणि फॉरेन्सिक टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. फॉरेन्सिक टीमने घटनास्थळावरून पुराव्यांचे संकलन केले आहे.

पोलिसांकडून तपास सुरू पोलीस आयुक्त म्हणाले, “इमारतीवर गोळीबार झाला असून आम्ही सर्व बाजूंनी तपास करत आहोत.” पोलीस सध्या परिसरातील CCTV फुटेजची तपासणी करत असून हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे. हा हल्ला एखाद्या गँगस्टरने दिलेली धमकी आहे की यामागे दुसरा काही हेतू आहे, याचा तपास पोलीस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts