Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईत ३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत काढली, ११११ फुटाची तिरंगा यात्रा
ताज्या बातम्या

मुंबईत ३ हजार विद्यार्थ्यांनी एकत्रित येत काढली, ११११ फुटाची तिरंगा यात्रा

Mumbai Tiranga Yatra by students

Mumbai Tiranga Yatra by students : नवी मुंबईतील वाशी येथे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या जयंतीचे औचित्य साधत आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा मुख्य उद्देश युवकांमध्ये देशभक्ती, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करणे हा होता.

हेही वाचा – बजाज पुणे ग्रँड टूर २०२६ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेचा थरार; अनुभवण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी

या तिरंगा यात्रेत विविध शाळा व महाविद्यालयांतील सुमारे ३ हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांनी मिळून तब्बल १,१११ फूट लांबीचा भव्य तिरंगा हातात घेत शहरातून शिस्तबद्ध आणि जोशपूर्ण मिरवणूक काढली. संपूर्ण परिसर देशभक्तीपर घोषणांनी, राष्ट्रगीत आणि प्रेरणादायी संदेशांनी भारावून गेला.

यात्रेदरम्यान नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या विचारांचा आणि कार्याचा उल्लेख करण्यात आला. ‘देशसेवा, त्याग आणि स्वातंत्र्यप्रेम’ या मूल्यांचा संदेश युवकांपर्यंत पोहोचवण्यात आला. अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी युवकांनी राष्ट्रउभारणीत सक्रिय भूमिका घ्यावी, सामाजिक जबाबदारी ओळखावी आणि संविधानिक मूल्यांप्रती निष्ठा राखावी, असे आवाहन केले.

या कार्यक्रमामुळे वाशी परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण झाले असून, सहभागी विद्यार्थ्यांनीही अशा उपक्रमांमुळे प्रेरणा आणि अभिमानाची भावना मिळाल्याचे मत व्यक्त केले.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts