Breaking News :
  • Home
  • मनोरंजन
  • ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे…’ मधील पात्राच्या ब्रॉंझ पुतळ्याचे अनावरण; SRK ने सोशल मीडियावर शेअर केले फोटो
मनोरंजन

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे…’ मधील पात्राच्या ब्रॉंझ पुतळ्याचे अनावरण; SRK ने सोशल मीडियावर शेअर केले फोटो

Shah Rukh Khan unveils DDLJ bronze statue and shares photos on social media

DDLJ bronze statue unveiled : बॉलीवूड चित्रपटसृष्टीतील आणि 90 च्या दशकातील नावाजलेली जोडी म्हणून शाहरुख खान आणि काजोल यांचे नाव समोर येते. त्यांचा 90 च्या दशकात गाजलेला चित्रपट दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे हा चित्रपट अत्यंत प्रसिद्ध झाला होता. आज या चित्रपटाला 30 वर्ष पूर्ण झाले असून लंडन येथे या चित्रपटातील राज आणि सिमरन यांच्या आयकॉनिक पात्रांचा ब्रॉंझ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले आहे.

गुरुवारी लंडन येथील लेस्टर स्क्वेअर याठिकाणी DDLJ चित्रपटाला 30 वर्षे पूर्ण झाल्याने या चित्रपटातील राज आणि सिमरन यांचे पात्र असलेल्या ब्रॉन्झ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यावेळी काजोलची मुले युग आणि न्यासा देखील उपस्थित होते. त्यानंतर SRK ने इंस्टाग्रामवर पोस्ट करत याबाबत माहिती दिली आणि फिल्मी अंदाजात हा क्षण चाहत्यांसोबत साजरा केला. तो देखील फिल्मी अंदाजात.

काय आहे पोस्ट

“बडे बडे देशों में ऐसी छोटी छोटी बाते होतीहती है, सिनोरिटा…!” या फिल्मी लाईनने कॅप्शन देत पोस्ट ची सुरुवात करत पोस्ट शेअर केली. आज लंडन येथे लेस्टर स्क्वेअर याठिकाणी राज आणि सिमरन यांच्या ब्रॉंझ पुतळ्याचे अनावरण करत असताना खूप आनंद झाला. DDLJ ला 30 वर्षाचा सोहळा खास बनला आहे. पहिला भारतीय चित्रपट म्हणून सिन इन द स्क्वेअर ट्रेलमध्ये स्थान मिळणे हा मोठा मान आहे. यासाठी UK मधील सर्वाना मनापासून धन्यवाद. तुम्ही लंडनला आल्यावर या ठिकाणी नक्की भेट द्या. अशा आशयाची पोस्ट अभिनेता शाहरुख खानने केली आहे. तसेच यासोबत त्यांनी तेथील फोटोस देखील शेअर केले आहे.

हे ही वाचा : धर्मेंद्रजींच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; धर्मेंद्र यांचा वाढदिवस चाहत्यांसोबत होणार सेलिब्रेट

काजोल च्या मुलांनी देखील घेतला सहभाग

या कार्यक्रमावेळी काजोल आणि शाहरुख खान हटके अंदाजात दिसले. शाहरुख खान काळया सूट मध्ये तर काजोलने हिरव्या निळ्या पेस्टल शेडमध्ये सुंदर अशी साडी परिधान केली होती. एवढेच नाही तर काजोल यांचे मुले देखील DDLJ स्टाईल मधील लूक मध्ये दिसले. शाहरुख खान यांच्या पोशाखावर लावण्यात आलेला काऊबेल ब्रूच देखील आकर्षक दिसत होता.

भारतीय चित्रपटाचा पहिलाच पुतळा

लंडन येथे अनावरण करण्यात आलेला हा बॉंझ पुतळा भारतीय चित्रपटाचा पहिलाच पुतळा ठरला आहे. या जागेवर अगोदरच हॅरी पॉटर, मेरी पॉपीन्स, पँडिंग्टन सिंगीन इन द रेन , बॅटमन यासारखे जागतिक आयकॉनिक पात्रांचे पुतळे आहे. आता यामध्ये दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे या चित्रपटातील पात्रांचा देखी समावेश झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts