• Home
  • मनोरंजन
  • धर्मेंद्रजींच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; धर्मेंद्र यांचा वाढदिवस चाहत्यांसोबत होणार सेलिब्रेट
मनोरंजन

धर्मेंद्रजींच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी; धर्मेंद्र यांचा वाढदिवस चाहत्यांसोबत होणार सेलिब्रेट

Dharmendra smiling as he prepares to celebrate his birthday with fans

Dharmendra birthday celebration with fans : बॉलीवूड इंडस्ट्रीतील दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. त्यांनी 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. 3 डिसेंबर रोजी त्यांच्या अस्थी विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. लाडक्या अभिनेत्याचे अंतिम दर्शन देखील घेता न आल्याने चाहते प्रचंड नाराज झाले होते. त्यानंतर आता अभिनेता धर्मेंद्र यांचा 90 वा वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे. जाणून घेऊया त्यांच्या वाढदिवशी काय काय स्पेशल असणार आहे.

अभिनेते धर्मेंद्र यांचे चिरंजीव सनी देओल आणि बॉबी देओल यांनी वडिलांचा वाढदिवस स्पेशल करण्याचे ठरवले आहे. याबाबत त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे. धर्मेंद्र यांचा वाढदिवस 8 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. यंदा त्यांचा 90 वा वाढदिवस होता. सनी देओल आणि बॉबी देओल यांनी हा वाढदिवस लोणावळ्यातील फार्महाऊस वर करणार असल्याची माहिती दिली आहे. आणि महत्वाचं म्हणजे आता चाहत्यांना देखील फार्महाऊस मध्ये एंट्री देण्यात येणार आहे. यावेळी देओल कुटुंब धर्मेंद्र यांच्या चाहत्यांना भेटणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा येथील फार्महाउस वर धर्मेंद्र यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असून दुपारी 1 वाजे दरम्यान सेलिब्रेशन सुरू होणार आहे. यावेळी फार्महाऊसवर चाहत्यांना थेट एण्ट्री मिळणारअसून कोणतेही पास त्यांच्यासाठी ठेवण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी हेमा मालिनी यांनी मीडिया आणि चाहत्यांना धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन सुद्धा घेता आल्याने नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता वाढदिवशी चाहत्यांना थेट एंट्री देण्यात आली आहे.

काय होती पोस्ट

8 डिसेंबर रोजी धरम पाजी यांचा वाढदिवस चाहत्यांसोबत साजरा होणार देओल कुटुंब चाहत्यांना भेटणार…. अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. तसेच या पोस्ट मध्ये ऍड्रेस आणि पासेसची आवश्यकता नसल्याची माहितीही देण्यात आली आहे.

हे ही वाचा : रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या फेब्रुवारीत लग्न करणार असल्याच्या अफवांना एका वाक्यात फुलस्टॉप; या विषयावर रश्मिकाने सोडले मौन

24 नोव्हेंबर रोजी प्राणज्योत मालवली

ही मॅन  म्हणून  ओळख  निर्माण  केलेले  धर्मेंद्र  यांच्या  पश्चात  त्यांची पहिली  पत्नी प्रकाश कौर , दुसरी पत्नी हेमा मालिनी  यासह सहा मुले आहे. काही काळापासून धर्मेंद्र आजारी होते. त्यांची 10 नोव्हेंबर रोजी अचानक तब्येत खराब झाली होती. त्यावेळी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी डिस्चार्ज देण्यात आला होता. त्यानंतर 24 नोव्हेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

65 वर्षे अभिनयात सक्रिय

1960 मध्ये “दिल भी तेरा हम भी तेरे” या चित्रपटातून धर्मेंद्र यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर 1961 मध्ये आलेल्या “बॉयफ्रेंड” या चित्रपटात ते सहाय्यक अभिनेत्याच्या भूमिकेत दिसले. धर्मेंद्र 65 वर्षे अभिनयात सक्रिय राहिले, त्यांनी असंख्य हिट, सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. त्यांनी शोले (1975), चुपके चुपके (1975), सीता और गीता (1972), धरमवीर (1977), फूल और पत्थर (1966), जुगनू (1973), आणि यादों की बारात (1973) यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts