Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शेतकरी आंदोलन चिघळले; महादेव जानकर यांना ताब्यात, विनायक राऊत व राजू शेट्टीही पोलिसांच्या ताब्यात…
Mumbai

शेतकरी आंदोलन चिघळले; महादेव जानकर यांना ताब्यात, विनायक राऊत व राजू शेट्टीही पोलिसांच्या ताब्यात…

Farmer Protest Maharashtra: कोकणातील आंबा आणि काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी काढलेले शेतकरी आंदोलन आज चिघळले. गिरगाव चौपाटी ते वर्षा बंगल्यापर्यंतच्या मोर्चादरम्यान पोलिसांनी कारवाई करत विनायक राऊत, राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांच्यासह अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.

या मोर्चाचे नेतृत्व विनायक राऊत(Vinayak Raut), राजू शेट्टी (Raju Shetti) आणि महादेव जानकर (Mahadev Jankar) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. मात्र मोर्चा काढू नये म्हणून पोलिसांनी आधीच संबंधित नेत्यांना नोटीस बजावली होती. तरीही मोर्चा पुढे नेण्यात आला.

हेही वाचा: अरेरे! चक्क गायकावर पैशांचा पाऊस; व्हायरल व्हिडिओने वेधले लक्ष

वर्षा बंगल्याच्या दिशेने मोर्चा पोहोचताच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी आंदोलन आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचेही समोर आले आहे. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने पोलिसांनी कारवाई करत काही आंदोलकांना ताब्यात घेतले.

शेतकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात

या कारवाईत प्रमुख नेते राजू शेट्टी, विनायक राऊत, महादेव जानकर यांच्यासह अनेक शेतकरी कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याच दरम्यान महादेव जानकर यांना पोलिसांनी उचलून नेल्याची माहिती समोर आली आहे.

प्रमुख नेत्यांना ताब्यात घेतल्याने आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता असून पोलिसांकडून परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts