Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • ओबीसी आरक्षणाच्या 1994 निर्णयावर प्रश्नचिन्ह; जरांगे पाटलांचे वक्तव्य काय?
Top News

ओबीसी आरक्षणाच्या 1994 निर्णयावर प्रश्नचिन्ह; जरांगे पाटलांचे वक्तव्य काय?

Manoj Jarange Patil: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून मनोज जरांगे पाटील यांनी 1994 मधील ओबीसी आरक्षण निर्णयाच्या निकषांवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे आरक्षणावरील वादाला नवे वळण मिळाले आहे. दरम्यान, भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे पाटलांची भेट घेऊन या विषयावर सविस्तर चर्चा केली.

छत्रपती संभाजीनगर येथे झालेल्या या भेटीत जरांगे पाटील यांनी स्प्ष्टपणे सांगितले की, मराठा समाज “ओबीसी आरक्षण मागत नाही, तर आपला हक्क मागत आहे.” त्यांनी दावा केला की अनेक मराठा कुटुंबांकडे शेती असूनही त्यांची आर्थिक परिस्थिती कमजोर आहे आणि त्यांना उपजीविकेसाठी ऊसतोडी, मजुरीसारखी कामे करावी लागतात.

हेही वाचा: प्रसाद लाड आणि मनोज जरांगे भेटीत भावनिक क्षण; मराठा आरक्षणावर चर्चा, नेमकं काय घडलं?

जरांगे पाटील यांनी ओबीसी आरक्षणाच्या मूळ निकषांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत विचारले की, “१९९४ मध्ये ओबीसींना आरक्षण कोणत्या आधारावर दिले गेले? तसेच मराठा समाजाला अनेकदा मागास ठरवूनही आरक्षण का मिळत नाही, असा सवाल त्यांनी केला.

त्यांनी आणखी आरोप करत म्हटले की, मराठा समाजाकडे असलेल्या “गॅझेट” आणि नोंदी असूनही त्यांना सरसकट प्रमाणापत्र दिले जात नाही. तसेच ओबीसींची संख्या काही वर्षांत मोठ्या प्रमाणात कशी वाढली, यावरही त्यांनी शंका व्यक्त केली.

या चर्चेदरम्यान त्यांनी मंडळाच्या सर्व्हे पद्धतीवरही प्रश्न उपस्थित करत “नेमका कोणता सर्व्हे झाला आहे, तो सार्वजनिक करावा,” अशी मागणी केली.

या घडामोडींमुळे मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय आणि सामाजिक चर्चा तीव्र झाली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts