Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • राष्ट्रवादीत चाललंय काय? इद्रीस नायकवाडींना राजीनाम्याची मागणी
Top News

राष्ट्रवादीत चाललंय काय? इद्रीस नायकवाडींना राजीनाम्याची मागणी

Idris Nayakwadi Resignation

NCP Idris Nayakwadi Resignation Demand : राष्ट्रवादीचे आमदार इद्रीस नाईकवाडी (Idris Naikwadi) यांच्याकडे राजीनामा मागितल्याची बातमी समोर आलीये. राष्ट्रवादीच्या युवा नेत्याने हा राजीनामा मागितला (Resignation demanded) असल्याची चर्चा आहे. इद्रीस नाईकवाडी हे सांगली जिल्ह्यातील मिरज येथील प्रभावी नेते आहेत. त्यांनी सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेचे (Sangali Politics) महापौर म्हणून काम पाहिले आहे. सध्या ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे अल्पसंख्याक विभागाचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच जेव्हा राष्ट्रवादीत फूट पडली, तेव्हा जयंत पाटलांच्या बालेकिल्ल्यात राहूनही नाईकवाडींनी अजित पवारांना (Ajit Pawar) साथ दिली. त्यामुळे अजित दादांचे विश्वासू कार्यकर्ते आणि नेते म्हणून ओळखले जात होते.

हेही वाचा – नवीन पटनायक यांना मोठा धक्का, एकदम जवळच्या खासदाराने सोडली साथ

इद्रीस नाईकवाडी यांच्याकडे राजीनामा मागितला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. १५ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कार्यालयातून OSD ने नायकवडी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान त्यांनी नायकवडी यांना राजीनामा देण्याचा निरोप दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र नायकवडी यांनी स्पष्ट केले की, आमदार म्हणून त्यांच्याकडे अनेक अधिकारी येत असतात, परंतु असा कोणताही अधिकृत निरोप त्यांच्यापर्यंत पोहोचलेला नाही.

स्वतः इद्रीस नायकवडी यांनी या सर्व चर्चांचे खंडन केले आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांनी अद्याप कोणताही राजीनामा दिलेला नाही आणि ते सध्या राजीनामा देण्याच्या मनस्थितीत नाहीत. राजीनाम्याच्या या सर्व चर्चा केवळ वावड्या असून त्यामागे कोणताही अधिकृत आधार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. जर पक्षातून अधिकृत माहिती आली, तरच ते विचार करतील, असं त्यांनी सांगितलं आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा नेत्यांना इद्रीस नायकवडी यांचा राजीनामा हवा

या वादामागे पक्षांतर्गत मोठी गटबाजी असल्याचे दिसून येतंय राष्ट्रवादी काँग्रेसमधील युवा नेत्यांना इद्रीस नायकवडी यांचा राजीनामा हवा आहे. ज्यांच्या राजकीय इच्छा-आकांक्षा पूर्ण होऊ शकल्या नाहीत किंवा ज्यांना विधान परिषदेवर जाण्याची संधी हवी आहे, अशा काही घटकांकडून ही मागणी लावून धरली जात असल्याचे संकेत मिळत आहेत. नायकवडी यांनी स्वतः असे म्हटले आहे की, पक्षातील काही लोकांच्या इच्छा पूर्ण झाल्या नसाव्यात, त्यामुळे ते अशा अपेक्षा करत असतील.

नायकवडी यांची निवड मुस्लिम चेहरा म्हणून करण्यात आली

नायकवडी हे राज्यपाल नियुक्त आमदार आहेत. जर त्यांनी राजीनामा दिला, तर रिक्त होणाऱ्या या जागेवर पक्षातील दुसऱ्याची वर्णी लावली जाऊ शकते. नायकवडी यांची निवड मुस्लिम चेहरा म्हणून करण्यात आली होती. मात्र, आगामी निवडणुकांचे समीकरण पाहता, एखाद्या दुसऱ्या समाजाच्या नेत्याला किंवा अधिक प्रभावी युवा नेत्याला या पदावर बसवून नवी राजकीय गोळाबेरीज करण्याचा पक्षाचा प्रयत्न असू शकतो. स्वतः नायकवडी यांनीच सूचित केले आहे की, पक्षातील काही लोकांच्या राजकीय इच्छा पूर्ण झाल्या नाहीत, त्यामुळे ते अशा अफवा पसरवून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न करत असावेत.

पार्थ पवार आपला स्वतःचा निष्ठावंत गट तयार असल्याची चर्चा

अजित पवार यांच्यानंतर पक्षाची धुरा सांभाळण्यासाठी पार्थ पवार आपले स्वतःचे निष्ठावंत गट तयार करत आहेत. विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या सभागृहात आपल्या शब्दातील माणूस असावा, अशी त्यांची राजकीय रणनीती असू शकते. पश्चिम महाराष्ट्रातील विशेषतः सांगली-मिरज भागातील राजकारणावर प्रभाव टाकण्यासाठी जुन्या फळीतील नेत्यांऐवजी नव्या दमाच्या नेत्यांना पुढे आणणे, हा पार्थ पवार यांच्या राजकीय वाटचालीचा भाग असू शकतो. उद्या होणाऱ्या बैठकीत इद्रीस नायकवाडी यांचा राजीनामा घेतला जाणार का? हे पाहणं आता महत्वाच ठरणार आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts