Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • राजकारण
  • काँग्रेस फोडणार भाजपचे 100 नगरसेवक? 15 लाखांचा रेट ठरल्याची चर्चा…
Top News

काँग्रेस फोडणार भाजपचे 100 नगरसेवक? 15 लाखांचा रेट ठरल्याची चर्चा…

BJP Corporators Defection Rumors

BJP Corporators Defection Rumors : राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) गेल्या काही दिवसांपासून सतत बदल होताना दिसत आहे. या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणे हे तर शाळेत प्रवेश घेण्यापेक्षा सोपे झाले आहे. काही आमदार-खासादर निवडून येतात एका पक्षात आणि प्रवेश करतात दुसऱ्या पक्षात. तर काही ठिकाणी तर आमदाराच्या फुटीमुळे सरकार कोसळते. महाराष्ट्रातच शिवसेनेत दोन गट झाले आणि उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले होते. आता भाजपचे 100 नगरसेवक (BJP 100 Corporater) आमच्या संपर्कात आहे, असा दावा काँग्रेस (Congress) आमदार विजय वडेट्टीवार (Vijay Wasettiwar) यांनी केला आहे. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूंकप होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

हेही वाचा – सुप्रिया सुळेंच्या मुलगीचा सासरा भाजप आमदार? निवडणूक १०० कोटींची होणार?

राज्यात विधान परिषदेच्या 17 जगाावर निवडणूक होत आहे. या जागेवरुन निवडणूक लढवण्यासाठी महायुतीकडून इच्छूकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. तसंच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे वरिष्ठ नेते आणि उद्योजक अरुण लखानी हे निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यांचे नाव सध्या चर्चेत आहे..लखानी हे खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही आहेत. काही दिवसातच सुळेंची मुलगी रेवती सुळेचं लग्न अरुण लखानी यांचे पूत्र सारंग लखानीसोबत होणार आहे. मात्र अरुन लखानी यांना उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्यानंतर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जोरदार टीका केली आहे.

ही निवडणूक100 कोटींची होणार आहे

अरुण लखानी असू देत किंवा कुठल्या दुसरे उद्योगपती असू देत, शेवटी ते उद्योगपतीच आहेत. ही निवडणूक100 कोटींची होणार आहे. आता तर त्यांचे संबंध मोठ्या राजकीय परिवाराशी जोडले गेले आहेत. अशा परिस्थितीत सामान्य माणसाला या निवडणुका आवाक्याबाहेरच्या आहेत. किमान आमच्यासारख्या तरी लोकांच्या आवाक्याच्या बाहेरच्या दिसत आहेत, असे विजय वडेट्टीवार यांनी म्हटले. सध्या तर विधानपरिषद निवडणुका म्हणजे उत्सव झाला आहे. आमच्या संपर्कातही भाजपचे 100 नगरसेवक आहेत. त्यांच्यातही अंतर्गत वाद आहेत. पण आम्ही या घोडेबाजारापासून आणि फोडाफोडी च्या राजकारणापासून लांब आहोत, असा दावा विजय वडेट्टीवार यांनी केलाय.

विधानपरिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट

विधानपरिषदेच्या प्रत्येक मतासाठी 15 लाखांचा रेट ठरला आहे. काही नगरसेवकांना पाच लाख रुपयांचे टोकन देऊन उचलण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे निष्पक्ष निवडणुका होणे आणि योग्य माणसाची निवड होणे दूरच राहिले. अशा निवडणुकांमध्ये व्यापारी आणि उद्योगपती पैसे गुंतवतात. अशाने भविष्यात विधानपरिषद निवडणुका या कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात जातील. सामान्य माणूस भविष्यात विधानपरिषदेत दिसणार नाही. एका मतासाठी 15 लाखांचा रेट आहे. नगरसेवकांना इतके पैसे मिळाल्यानंतर त्यांना दिवाळी आहे असं वाटत आहे. या सगळ्यामुळे लोकशाही शिल्लक राहील की नाही, हा प्रश्न पडतो, अशी टाकी देखील विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.

वडेट्टीवार यांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात खळबळ

विजय वडेट्टीवार यांच्या 100 नगरसेवकांच्या दाव्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी काँग्रेससह इतर पक्षांचे आमदार-खासदार, नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची बातमी समोर येत होती. मात्र आता चक्क भाजपचे नगरसेवक काँग्रेसच्या संपर्कात असल्याने भाजपमध्ये सर्व आलबेल नाही, असं म्हटलं जात आहे. महाराष्ट्रात भाजपच्या नेत्यांमध्ये नाराजी आहे का? काँग्रेसच्या संपर्कात असलेले 100 नगरसेवक कोण आहेत? असा प्रश्न निर्माण झालाय. तसंच विजय वडेट्टीवार यांनी चर्चेत राहण्यासाठी असा दावा केलाय, असा आरोपही भाजपकडून केला जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस चांगलीच अॅक्टीव्ह पाहायला मिळत आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मोठा दावा करत मोदी सरकार पुढच्या वर्षी जाणार असं म्हटलं आहे.

 वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम

काँग्रेसच्या अल्पसंख्याक सल्लागार समितीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी उपस्थितीती लावली होती. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुढील वर्षात पदत्याग निश्चित असल्याचा दावा राहुल गांधींनी केला. आंतरराष्ट्रीय आर्थिक परिस्थिती आणि देशातील वाढता आर्थिक असंतोष हे प्रमुख घटक असतील. बदलत्या परिस्थितीचा आणि वाढत्या जन असंतोषाचा भारतीय राजकारणावर परिणाम होईल, असा दावा राहुल गांधींनी केल्याची माहिती आहे. राहुल गांधींच्या या दाव्यामुळे देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. मोदी सरकार देशातील सर्वात मजबूत सरकार मानल्या जाते. मात्र याच मोदी सरकारला पुढच्या वर्षी मोठा धक्का बसणार असा दावा राहुल गांधींनी केलाय. याचे पडसाद महाराष्ट्रात उमटत असतानाच आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील आता मोठा दावा केला आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात आणि देशाच्या राजकारणात काहीतरी मोठे घडणार असं म्हटलं जात आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts